नातवानेच चोरल्या उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांच्या 5 सनई

By Admin | Updated: January 10, 2017 19:03 IST2017-01-10T19:03:42+5:302017-01-10T19:03:42+5:30

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांच्या गेल्या महिन्यात चोरीला गेलेल्या पाच सनई त्यांच्या नातवानेच चोरल्याचं आता समोर आलं आहे.

5 clarinet of grandfather Ustad Bismillah Khan | नातवानेच चोरल्या उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांच्या 5 सनई

नातवानेच चोरल्या उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांच्या 5 सनई

ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 10 - भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांच्या गेल्या महिन्यात चोरीला गेलेल्या पाच सनई त्यांच्या नातवानेच चोरल्याचं आता समोर आलं आहे. उत्तर प्रदेश शीघ्र कृती दलाने (STF) चोरील्या गेलेल्या 5 पैकी 4 सनई हस्तगत केल्या आहेत.
या प्रकरणी बिस्मिल्लाह खाँ यांचा नातू हसन शादाब आणि दोन सोनारांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बिस्मिल्लाह खाँ यांच्या पाच सनई वाराणसी येथील त्यांच्या घरातून चोरी झाल्या होत्या. खाँ यांचा मुलगा काझीम हसन याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यातील एक शहनाई माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी भेट दिली होती, याशिवाय बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी त्यांना शहनाई भेट दिली होती.

Web Title: 5 clarinet of grandfather Ustad Bismillah Khan