शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'या' पाच कारणांमुळे सीबीआय संचालक आलोक वर्मांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 11:00 IST

मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीकडून वर्मांची उचलबांगडी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना दिलासा देत मोदी सरकारला झटका दिला. मात्र अवघ्या 48 तासांमध्ये निवड समितीनं वर्मा यांना पदावरून दूर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीनं केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाच्या आधारे वर्मा यांची हकालपट्टी केली. या समितीत मोदींसह लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांचा समावेश होता. पाच गंभीर आरोपांमुळे वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 1. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालातील काही गंभीर बाबींचा आधार घेत वर्मा यांना हटवण्याचा निर्णय घेतला. मांस निर्यात क्षेत्रातील उद्योगपती मोईन कुरेशीच्या संबंधित प्रकरणात वर्मा यांनी सतीश बाबू सनाकडून 2 कोटींची लाच घेतल्याचा आरोप सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केला होता. वर्मा यांचं वर्तन संशयास्पद असल्याचा ठपका सीव्हीसीनं ठेवला होता. 2. रेल्वेच्या 2 हॉटेलांच्या कंत्राटाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातही वर्मा यांच्यावर गंभीर आरोप आहेत. सबळ पुरावे नसतानाही वर्मा यांनी या प्रकरणातून एका वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवल्याचा आरोप आहे. वर्मांनी या प्रकरणातून संबंधित अधिकाऱ्याचं नावदेखील हटवलं. 3. हरयाणातील एका जमीन घोटाळ्यात वर्मांवर झालेले आरोपदेखील निवड समितीला गंभीर वाटले. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी बंद करण्यासाठी 36 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा आरोप होता. वर्मा हरयाणाच्या तत्कालीन शहर नियोजन संचालक आणि एका रियल इस्टेट कंपनीच्या संपर्कात होते, असे आरोप होते. या प्रकरणाचा अधिक तपास करण्याची गरज असल्याचं सीव्हीसीनं म्हटलं होतं.4. 2016 मध्ये वर्मा दिल्ली पोलिसात आयुक्त म्हणून काम करत होते. त्यावेळी सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला जकात विभागानं ताब्यात घेतलं होतं. त्याला वाचवल्याचा आरोप वर्मांवर आहे. वर्मा यांनी त्या तस्कराला पोलीस सुरक्षेत सोडून देण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं जातं. यामध्ये त्यांच्याविरोधातील आरोपांमध्ये काही प्रमाणात तथ्य आढळून आलं. सीबीआयच्या एका पथकाकडून या प्रकरणाच्या चौकशीची गरजदेखील सीव्हीसीनं व्यक्त केली होती. 5. वादग्रस्त अधिकाऱ्यांना सीबीआयमध्ये घेतल्याचा आरोपदेखील वर्मांवर आहे. वर्मांनी दोन वादग्रस्त अधिकाऱ्यांना सीबीआयमध्ये आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. या दोघांविरोधात अतिशय प्रतिकूल अहवाल असूनही वर्मा त्यांच्यासाठी आग्रही होते. हे आरोप गंभीर असल्याचं सीव्हीसीनं अहवालात नमूद केलं होतं.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदी