शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘498-अ’चा हाेताेय शस्त्रासारखा वापर;  सर्वाेच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 06:12 IST

- डॉ. खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पती व पतीच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाला आळा घालण्यासाठी निर्मित कायद्याच्या ...

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पती व पतीच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाला आळा घालण्यासाठी निर्मित कायद्याच्या ‘कलम ४९८-अ’चा दुरुपयोग होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. पतीसह सासरच्या मंडळींचा बदला घेण्यासाठी हे एक कायदेशीर शस्त्र बनले असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तामिळनाडूच्या एका प्रकरणात न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना व न्या. एन. कोटीश्वर सिंग यांनी हे मत मांडून पतीविरुद्ध दाखल छळवणुकीचा गुन्हा रद्द केला.

प्रकरण काय?लक्ष्मीनारायण यांचा मार्च-२०१५ मध्ये विवाह झाला. जोडपे तामिळनाडूतील जोल्लारकोटा येथे एकत्र राहू लागले. त्यांना दोन मुले झाली. मात्र, फेब्रुवारी-२०२२ मध्ये पत्नीने पती व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध हुंडाविरोधी कायद्यानुसार (४९८-अ) तक्रार दिली. याचे पुरावे देऊन लक्ष्मीनारायण यांनी हा गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली. परंतु, तेलंगणा उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

घरातून निघून जात होती पत्नी : पतीचा खुलासालक्ष्मीनारायण यांनी पत्नीने केलेले छळाचे आराेप नाकारून आपली बाजू मांडली. त्यांच्यानुसार, पत्नी घरातून न सांगताच निघून जात होती.याबाबत एकदा पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी तिला शोधून काढले तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याचे स्पष्ट झाले. समुपदेशनानंतर ती परत आली.भविष्यात पुन्हा असे जाणार नाही, असे पोलिसांत लेखी दिले. परंतु, पुन्हा ती निघून गेली. लक्ष्मीनारायण यांनी कायदेशीर घटस्फोटाची नोटीस दिल्यानंतर पत्नीने ४९८-अनुसार तक्रार दिली.

अशा प्रकरणांत सावधगिरी गरजेचीnदेशभरात वैवाहिक वादांत प्रचंड वाढ, विवाह संस्थेत कलह-तणाव वाढले.nअवास्तव मागण्या पूर्ण करण्यासाठी पती व कुटुंबीयांविरुद्ध ४९८-अ कलमाचा वापर चिंताजनक, असल्याचे निरिक्षण सर्वाेच्च न्यायालयाने निकाल देताना नाेंदविले.nक्रौर्याचा सामना करणाऱ्या महिलेने गप्प राहून सहन करण्याची गरज नाही. परंतु, न्यायालयांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

टॅग्स :Divorceघटस्फोटSupreme Courtसर्वोच्च न्यायालय