बेळगाव: बेळगाव शहरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन आणि वाहनासह ५०० रुपयांच्या एकूण ४९५ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.मोहम्मद अरबाज (वय २१, रा. दक्षिण गोवा), रुपेश हनुमंत वाकोडे (२६, रा. गोवा), मोहम्मद हुसेन बक्की (२३, रा. मडगाव, दक्षिण गोवा) आणि श्रवणकुमार तुंतुमल्ली (२५, रा. बेगुसराय, बिहार) अशी संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२६ रोजी आरोपींनी खडे बाजार रोडवरील एका दुकानातून वस्तू खरेदी केल्या आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा वापरून पैसे दिले. दुकानदाराला नोटा बनावट असल्याचा संशय येताच त्याने मार्केट पोलिस ठाण्याला याची माहिती दिली.
तत्काळ कारवाई करत पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संशयितांना पकडून ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान चौघांनीही परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले.पोलिसांनी पुढील कारवाई करत आरोपींकडून ५०० रुपयांच्या एकूण ४९५ बनावट नोटा, अंदाजे ४०,००० रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, एक कार असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Belgaum police arrested four individuals for circulating counterfeit ₹500 notes. They seized 495 fake notes, mobile phones, and a car. The suspects confessed to using the fake currency at a local shop after the shopkeeper alerted the police.
Web Summary : बेलगाम पुलिस ने नकली ₹500 के नोट चलाने के आरोप में चार लोगों को गिरफ़्तार किया। उन्होंने 495 नकली नोट, मोबाइल फ़ोन और एक कार ज़ब्त की। संदिग्धों ने एक स्थानीय दुकान पर नकली मुद्रा का उपयोग करने की बात स्वीकार की, जिसके बाद दुकानदार ने पुलिस को सतर्क कर दिया।