४७ हजारांचा मोबाईलचा बॉक्स पळविला
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:19+5:302015-02-11T23:19:19+5:30
४७ हजारांचा मोबाईलचा बॉक्स पळविला

४७ हजारांचा मोबाईलचा बॉक्स पळविला
४ हजारांचा मोबाईलचा बॉक्स पळविलानागपूर : वर्धेला जाणाऱ्या गाडीत मोबाईलचे बॉक्स टाकताना ४७ हजार ८४५ रुपयांचा बॉक्स अज्ञात आरोपीने सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता पळविला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिवालसिंग देवीसिंग शेखावत (३४) रा. रामाजीची वाडी, राम कूलरजवळ हे राहुल कॉम्प्लेक्स विंग क्रमांक ३, प्लॉट नं. ११ शेखावत लॉजिस्टीक कोरीअर हॉस्पिटलसमोर वर्धा येथे जाणाऱ्या गाडीत मोबाईलचे बॉक्स टाकत होते. त्यांची नजर चुकवून अज्ञात आरोपीने १४ बॉक्सपैकी ४७ हजार ८४५ रुपये किमतीचा एक बॉक्स चोरून नेला.