उघड्यावर शौचास बसणार्या ४६ जणांना ताकीद
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30
पिंजर : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे गुड मॉर्निंग पथकाने ११ डिसेंबर रोजी भेट देऊन उघड्यावर शौचास बसल्याचे आढळून आलेल्या ४६ जणांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले.

उघड्यावर शौचास बसणार्या ४६ जणांना ताकीद
प ंजर : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे गुड मॉर्निंग पथकाने ११ डिसेंबर रोजी भेट देऊन उघड्यावर शौचास बसल्याचे आढळून आलेल्या ४६ जणांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बार्शीटाकळी पंचायत समितीच्यावतीने तालुक्यात गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाने गुरुवारी सकाळी पिंजर गावाला भेट दिली. यावेळी उघड्यावर शौचविधी करणारे ४६ जण आढळून आले. पथकाने या ४६ जणांना पुन्हा उघड्यावर शौच करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करून प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देऊन मार्गदर्शन केले. या पथकात विस्तार अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान जाधव, राहुल अरखराव, डाखोरे, तांबडे, विघेवार, अरविंद शिंदे, ओ. पी. कावलकर, ग्रामसेविका काळे, माणिकराव आदींचा समावेश होता. (वार्ताहर)