बँक मॅनेजर असल्याचे सांगून फसविले एटीएममधून ४४ हजार रुपये लंपास

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:17+5:302015-02-14T23:51:17+5:30

आकोट : बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचा मॅनेजर बोलतो, असे सांगून मोबाइलवरून एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्डची माहिती घेत बँक ग्राहकाच्या खात्यातून ४४ हजार ५७० रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधिताच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये १४ फेब्रुवारी रोजी स्वत:ला बँक मॅनेजर म्हणविणार्‍या इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

44 thousand rupees from the fraudulent ATM lapsed by telling that being a bank manager | बँक मॅनेजर असल्याचे सांगून फसविले एटीएममधून ४४ हजार रुपये लंपास

बँक मॅनेजर असल्याचे सांगून फसविले एटीएममधून ४४ हजार रुपये लंपास

ोट : बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचा मॅनेजर बोलतो, असे सांगून मोबाइलवरून एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्डची माहिती घेत बँक ग्राहकाच्या खात्यातून ४४ हजार ५७० रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधिताच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये १४ फेब्रुवारी रोजी स्वत:ला बँक मॅनेजर म्हणविणार्‍या इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. जी. हार्डवेअरतर्फे मो. गालीब रहेमान यांनी फिर्याद दिली की, १५ ते १६ जुलै २०१४ या कालावधीत ७०३३०७३०६९ क्रमांकाच्या मोबाइल क्रमांकावरून कॉल करणार्‍या अज्ञात इसमाने फिर्यादी व त्याच्या मुलाच्या मोबाइलवर कॉल करून त्यांच्या एटीएम कार्डचा नंबर व पासवर्ड खरा आहे का ? असे विचारले. फिर्यादीने खरा असल्याचे सांगितल्यानंतर मोबाइलधारकाने, तो बँक ऑफ इंडिया शाखा आकोटचा मॅनेजर असल्याचे सांगून एटीएमची तपासणी सुरू आहे असे सांगितले व त्यांचा एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्ड विचारला. तो सांगितल्यावर त्याने तुम्ही २४ तास एटीएम कार्डचा वापर करू नका, असे सांगितले. परंतु, दुसर्‍या दिवशी फिर्यादीने खात्याची तपासणी केली असता ४४ हजार ५७० रुपये परस्पर खात्यातून काढून घेण्यात आल्याचे लक्षात आले. त्यावरून मो.गालीब यांनी ७०३३०७३०६९ क्रमांकाच्या मोबाईलाारकाविरुद्ध फसवणूक केल्याबाबत फिर्याद नोंदविली. त्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलिसांनी सदर क्रमांकाच्या मोबाईलधारकाविरुद्ध भादंवि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
..........

Web Title: 44 thousand rupees from the fraudulent ATM lapsed by telling that being a bank manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.