शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रोखे योजनेत ४३८ कोटी रुपयांचीच खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:18 IST

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांमध्ये कमी प्रतिसाद

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : निवडणूक निधीत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने घोषित केलेल्या महत्त्वाकांक्षी निवडणूक रोखे योजनेच्या दुसºया व तिसºया टप्प्यांना तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला आहे. रोखे विक्री केवळ स्टेट बँक आॅफ इंडियाकडून (एसबीआय) होत होती. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ४३८.३० कोटींचे निवडणूक रोखे विकले गेले. तीन टप्प्यांत एकूण ९८० रोखे विकले गेले आहेत. काळ्या पैशांच्या संस्कृतीमुळे राजकीय व्यवस्थेत होणारा भ्रष्टाचार पूर्णत: निपटून काढण्याच्या उद्देशाने सरकारने निवडणूक रोखे योजना आणली होती. एकूण ४३७.३० कोटींचे ९५९ रोखे वठविण्यात आले. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात निवडणूक रोखे योजना घोषित केली होती. तसेच दोन हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी रोखीत घेण्यासही बंदी घातली होती. याला राजकीय पक्षांनी तीव्र विरोध करीत यामुळे निवडणूक निधीतील अपारदर्शकतेत अधिकच भर पडेल, असे म्हटले होते.काय आहे योजना?रोखे खरेदी करणाºयाचे नाव त्यावर नसते. तथापी, रोखे कोणी खरेदी केले, कोणत्या राजकीय पक्षासाठी देणगीदाखल हे रोखे घेतले, याची माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाकडेच असते. रोखे खरेदीदार व्यक्ती आपल्या पसंतीच्या राजकीय पक्षाला देऊ शकतात.तीन टप्प्यांत विक्री : ‘लोकमत’ने मिळविलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट समूहात या निवडणूक रोखे योजनेबाबत फारसा उत्साह दिसत नाही. मे २०१८ पर्यंत हे रोखे तीन टप्प्यांत विकण्यात आले.पक्षांनी ४३७.३० कोटी रुपयांचे रोखे वठवून घेतलेवित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, राजकीय पक्षांनी ४३७.३० कोटींचे रोखे वठवून घेतले आहेत. विशेष म्हणजे ११ कोटींचे २१ रोखे कोणत्याही नोंदणीकृतराजकीय पक्षाने सोडवून घेतले नाहीत. त्यामुळे हे रोखे आता निरर्थक ठरले आहेत. रोखे जारी केल्यानंतर पंधरा दिवसांच्या अवधीतच वठवून घेणे जरुरी असल्याने त्याचे मूल्यकवडीमोल असेल.- मार्चमध्ये पहिल्या टप्प्यात २२२ कोटी रुपयांचे ५२० रोखे विकत घेण्यात आले.- दुसºया टप्प्यात मात्र कमी प्रतिसाद मिळाला आणि २५६ रोख्यांतून ११४.९० कोटी रुपये जमा झाले.- तिसºया टप्प्यात रोखे विक्रीत आणखी घट झाली. केवळ १०१.२०४ कोटी रुपयांत२०४ रोखे विकले गेले.- चौथ्या टप्प्यातील रोखेही लवकरच जारी करण्यात येणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस