दोन सरकारी बँकांत 436 कोटींचा घोटाळा

By Admin | Updated: August 20, 2014 22:56 IST2014-08-20T22:56:24+5:302014-08-20T22:56:24+5:30

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि देना बँकेतील 436 कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघडकीस आला असून या बँकांचे न्यायवैद्यक (फोरेन्सिक) ऑडिट केले जाणार आहे.

436 crore scam in two government banks | दोन सरकारी बँकांत 436 कोटींचा घोटाळा

दोन सरकारी बँकांत 436 कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली / मुंबई : ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि देना बँकेतील 436 कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघडकीस आला असून या बँकांचे न्यायवैद्यक (फोरेन्सिक) ऑडिट केले जाणार आहे.
आर्थिक सेवा सचिव जी. एन. संधू यांनी आज येथे वार्ताहरांना ही माहिती दिली. ते येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. संधू म्हणाले,‘या कथित घोटाळा प्रकरणी काही कर्मचा:यांचे निलंबनही सुरू केले आहे व फोरेन्सिक ऑडिटचा आदेश देण्यात आला आहे.’ हा घोटाळा वैयक्तिक पातळीवरील कर्तव्य न पाळण्याचा असून तो संघटितपणो (सिस्टेमॅटिक) झालेला नाही, असेही संधू यांनी मुद्दाम सांगितले. हे असे घोटाळे खालच्या पातळीवर, बँकेच्या शाखेत घडतात. कारण तेथे जे नियम पाळायचे असतात ते पाळले जात नाहीत.
सिंडिकेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष एस. के. जैन यांना भूषण स्टील आणि अन्य कंपनीला पतमर्यादा वाढवून देण्यासाठी त्यांच्याकडून 5क् लाख रुपयांची लाच घेताना नुकतेच पकडण्यात आल्यानंतर पंधरवडय़ात हा घोटाळा उघडकीस आला आहे.
रिझव्र्ह बँकेचे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा यांनी, आम्ही या घोटाळ्याची गंभीर दखल घेतली आहे, आर्थिक व्यवहारांसाठीचे जे नियम आहेत त्यांच्या पालनाबद्दल अधिकारी खूपच संवेदनशील असले पाहिजेत, असे सांगितले. वैयक्तिक अपयशाची अनेक उदाहरणो आहेत. आम्ही त्यात लक्ष घालू. आज उपलब्ध असलेले नियम व कायदे हे पुरेसे समर्थ आहेत. तरीही घोटाळे होतात, कारण या नियम व कायद्यांचे पालन होत नाही, असेही मुंदडा म्हणाले. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समधील 18क् कोटी आणि देना बँकेतील 256 कोटी रुपये चुकीच्या मार्गानी वळविण्यात आल्याचा आरोप आहे. 
4या रकमा ठेवीदारांनी मुदत ठेव म्हणून ठेवल्या होत्या.
 
4या व्यवहाराला जबाबदार असलेल्यांची चौकशी सुरू असून काही लोकांना निलंबितही करण्यात आले आहे व चौकशी केली जात आहे, असे जी. एस. संधू यांनी सांगितले. 

 

Web Title: 436 crore scam in two government banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.