शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मद्यपींमुळे तीन वर्षांत ४१ हजार अपघात - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 06:21 IST

२०१६-१८ या वर्षांत ४० हजार ९८३ अपघात झाले आहेत. गिरीधारी यादव आणि रमा देवी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले.

नवी दिल्ली : २०१६ ते २०१८ या कालावधीत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांमुळे ४१ हजार अपघात झाल्याची माहिती रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. २०१६-१८ या वर्षांत ४० हजार ९८३ अपघात झाले आहेत. गिरीधारी यादव आणि रमा देवी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले.२०१६ मध्ये १४ हजार ८९४, २०१७ मध्ये १४ हाजर ७१ आणि २०१८ मध्ये १२ हजार १८ अपघात झाल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. मोटर वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालवल्यास तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. मंत्रालयाकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.गोंदिया-डोंगरगड रेल्वे सुरू करा!छत्तीसगडमध्ये डोंगरगड येथे बम्लेश्वरी हे प्रमुक धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नाही तर मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधूनही मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र, गोंदिया ते डोंगरगड दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षांपासूनया मार्गावर रेल्वे सुविधा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी नुकतीच लोकसभेत केली.नगरमध्ये स्वदेश,प्रसाद योजना सुरू करा!अहमदनगरला सांस्कृतिक वारसा असून शिर्डीतील साईबाबा मंदिर, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, शनी शिंगणापूर, दत्त मंदिर, भगवानगड अशा धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्य संग्रामातही अहमदर नगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अहमदनगरमध्ये स्वदेश आणि प्रसाद योजना सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.लडाखमधील गुंतवणूक वाढीसाठी काय करणार?बाहेरील लोकांना लडाखमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. मात्र, स्थानिक नागरिक जमीन विकण्यास तयार नाहीत. जमीन खरेदी केल्याशिवाय लडाखमध्ये गुंतवणूक करणे अशक्य आहे. त्यामुळे येथील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्याची माहिती द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरी