राज्यसभेच्या ४१ सदस्यांचा शपथविधी, अरुण जेटली पुन्हा सभागृहाचे नेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:50 IST2018-04-04T01:41:49+5:302018-04-04T05:50:33+5:30
राज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुमार केतकर, वंदना चव्हाण, व्ही. मुरलीधरण तसेच काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी, राजदचे मनोज झा आदींचा समावेश होता. तसेच अरुण जेटली यांची लोकसभेचे नेते म्हणून नियुक्ती झाली.

राज्यसभेच्या ४१ सदस्यांचा शपथविधी, अरुण जेटली पुन्हा सभागृहाचे नेते
नवी दिल्ली - राज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुमार केतकर, वंदना चव्हाण, व्ही. मुरलीधरण तसेच काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी, राजदचे मनोज झा आदींचा समावेश होता. तसेच अरुण जेटली यांची लोकसभेचे नेते म्हणून नियुक्ती झाली.
जेटली हे राज्यसभेवर उत्तर प्रदेशातून निवडून गेले असून त्यांचा आधीचा कार्यकाळ सोमवारी समाप्त झाला. राज्यसभेचे कामकाज मंगळवारी सुरू झाल्यानंतर सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सभागृह नेते म्हणून जेटली यांच्या नावाची घोषणा केली. तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी राज्यसभा सचिवालयाला दिले होते.