भीमाशंकरजवळील घाटात वारकर्‍यांच्या ट्रकला अपघात ४१ जखमी : जखमी हिंगोली जिल्‘ातील

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30

घोडेगाव : भीमाशंकरचे दर्शन घेऊन परतत असताना हिंगोली जिल्‘ातील ७० वारकर्‍यांनी भरलेल्या ट्रकला अपघात होऊन यामध्ये ४१ जण जखमी झाले. गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटून पोखरी घाटातील अवघड वळणावर गाडी पलटी होऊन हा अपघात झाला.

41 injured in Warkaris trunk collision near Bhimashankar: injured Hingoli district | भीमाशंकरजवळील घाटात वारकर्‍यांच्या ट्रकला अपघात ४१ जखमी : जखमी हिंगोली जिल्‘ातील

भीमाशंकरजवळील घाटात वारकर्‍यांच्या ट्रकला अपघात ४१ जखमी : जखमी हिंगोली जिल्‘ातील

डेगाव : भीमाशंकरचे दर्शन घेऊन परतत असताना हिंगोली जिल्‘ातील ७० वारकर्‍यांनी भरलेल्या ट्रकला अपघात होऊन यामध्ये ४१ जण जखमी झाले. गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटून पोखरी घाटातील अवघड वळणावर गाडी पलटी होऊन हा अपघात झाला.
आळंदीतून माऊलींची पालखी निघण्यापूर्वी विदर्भ, मराठवाडा येथून आलेले अनेक वारकरी भीमाशंकरच्या दर्शनासाठी येत असतात. हिंगोली जिल्‘ातील वसमत तालुक्यातील महागाव, पिंपराळा, खांडेगाव, टेंभुर्णी, वडताळा येथील हे ७० वारकरी नाशिक त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन भीमाशंकरकडे आले होते. आज दि. ६ रोजी पहाटे दर्शन घेऊन आळंदीकडे जात असताना मंचर- भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील कळमजाई मंदिराजवळ अवघड वळणावर ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने सकाळी ९.१५ च्या सुमारास अपघात झाला.
अपघात झाल्याचे दिसताच सोमनाथ गेंगजे व मापोली ग्रामस्थांनी तत्काळ मदत करण्यास सुरुवात कली. डिंभे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडेगाव पोलीस ठाण्यासही कळविले. तात्काळ पोलीस व घोडेगाव, मंचर येथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. सर्व जखमींना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गीता कुलकर्णी यांनी रुग्णालयात उपचारासाठी सर्व तयारी केली होती. काही रुग्ण मंचर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. यातील लीलाबाई तुकाराम जाधव (वय ६५) व दत्तात्रय बालाजी जाधव (वय ६५) या दोघांची प्र्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. घोडेगावमधील सहानभूती सेवाभावी संस्थेच्या स्वयंसवेकांनीही मदत यावेळी केली.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात येऊन सर्व जखमींची विचारपूस केली. तसेच वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर व जयप्रकाश मुंदडा यांना दूरध्वनी करून अपघाताची माहिती दिली व जखमींवर उपचार सुरू असून, सर्व व्यवस्थित असल्याचे त्यांच्या घरी निरोप देण्यास सांगितले. या सर्व वारकर्‍यांची घोडेगाव येथील वनमाला मंगल कार्यालयात जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली. त्यांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे़
दरम्यान, आमदार नीलम गोर्‍हे यांनी दुपारी चार वाजता घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात येऊन अपघातग्रस्तांची भेट घेतली. दरवर्षी वारकर्‍यांच्या गाड्यांना अपघात होतात, याची वेगवेगळी कारणे असली तरी शासन त्यांना मदत करते. याही दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच भीमाशंकरकडे जाणारा रस्ता वळणावळणाचा असून, येथे नेहमी दरडी कोसळतात. हा रस्ता सोपा करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी चांगल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक केले.

़़़़़़़़़़़़़़़़़
060752015-ॅँङ्मि-02 –
भीमाशंकरचे दर्शन घेवून आळंदीकडे जात असताना पोखरी घाटात हिंगोळी जिल्हयातील वारक-यांच्या गाडीला झालेला अपघात
060752015-ॅँङ्मि-03 : भीमाशंकरचे दर्शन घेऊन आळंदीकडे जाताना ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने पोखरी घाटात अपघात होऊन ४१ जण जखमी झाले़ अपघातग्रस्त वाहन.
छाया - नीलेश काण्णव

Web Title: 41 injured in Warkaris trunk collision near Bhimashankar: injured Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.