आंध्र प्रदेशातील विजयनगरम परिसरात प्रभू श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच भाजपा नेते सुनील देवधर यांनी आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर होत असलेले हल्ले हे १६ व्या शतकातील गोव्यातील क्रूर सेंट झेविअरच्या हल्ल्यांची आठवण करून देत असल्याचं म्हटलं."आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर सतत होत असलेल्या हल्ल्यांवरून तालिबानकडून बामियान येथे तोडण्यात आलेल्या बुद्धाच्या प्रतीमेती आठवण झाली. ही घटना अतिशय भयावह आहे. मंदिरांवरील हल्ल्यांवर जगनमोहन रेड्डी सरकारचं मौन हे त्यांचं समर्थन दाखवत आहे," असा आरोपही सुनील देवधर यांनी केला. "एकीकडे अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे आणि तर दुसरीकडे या ठिकाणी रामाची मूर्ती तोडण्यात आली," असं मत जनसेना प्रमुख आणि चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश केलेल्या पवन कल्याण यांनी व्यक्त केलं. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.
आंध्र प्रदेश : श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडली; भाजपा म्हणतं, "हे १६ व्या शतकातल्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:21 IST
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील विजयनगरम परिसरात प्रभू श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली.
आंध्र प्रदेश : श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडली; भाजपा म्हणतं, हे १६ व्या शतकातल्या...
ठळक मुद्देविरोधकांकडून जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीकाअशा घटना सोळाव्या शतकातील घटनांची आठवण करून देत असल्याचं भाजपाचे सुनिल देवधर यांचं वक्तव्य