शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

४० वर्षांपूर्वी झाले होते ४०० पार, आता इतिहास बदलणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:12 IST

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती.

नवी दिल्ली : लोकसभानिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना सगळीकडे केवळ ४०० पारचा नारा दिसत आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाला ३७० पेक्षा जास्त, तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोणाला किती जागा मिळतील, हे येणाऱ्या काही महिन्यांत कळेलच, पण भूतकाळाबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी ४०० जागा जिंकून इतिहास रचण्यात आला आहे. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला तब्बल ४०४ जागा मिळाल्या होत्या. एवढा मोठा आकडा गाठणे हे देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच आणि ऐतिहासिक ठरले होते.

नेमके काय झाले? - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती.- त्याचा परिणाम म्हणून १९८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५१४ पैकी ४०४ जागा जिंकून इतिहास रचला. - या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ५,३१२ उमेदवार उभे होते. त्यापैक १,२४४ राष्ट्रीय पक्षांचे आणि १५१ प्रादेशिक पक्षांचे होते. - निवडणुकीत ३,७९१ अपक्ष उमेदवार उभे होते, त्यातील केवळ ५ लोकसभेत पोहोचले.

पंतप्रधान कोण झाले? इंदिरा गांधी यांची हत्या २१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या लॉनमध्ये त्यांच्याच दोन अंगरक्षकांनी केली होती. डिसेंबर १९८४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. लोकसभेच्या ५१४ जागांसाठी २४-२८ डिसेंबर रोजी मतदान झाले. यानंतर राजीव गांधी यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली.

विरोधी पक्ष कोण? ३० जागा जिंकून टीडीपी विरोधी पक्ष म्हणून संसदेत आला. प्रथमच एक प्रादेशिक पक्ष विरोधी पक्ष झाला होता.

भाजपची ही पहिलीच निवडणूक होती१९८० मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. १९८४ मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही. पक्षाने २२४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त २ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

भाजपची ही पहिलीच निवडणूक होती१९८० मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. १९८४ मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही. पक्षाने २२४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त २ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

ती एकमेव लोकसभा निवडणूक१९८४ च्या निवडणुकीत २५.६२ कोटींपेक्षा अधिक मतदान झाले होते. ही २०१४ पर्यंतची शेवटची निवडणूक होती ज्यामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले होते. याशिवाय आजपर्यंतची ही एकमेव लोकसभा निवडणूक होती, जेव्हा एका पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

ती एकमेव लोकसभा निवडणूक१९८४ च्या निवडणुकीत २५.६२ कोटींपेक्षा अधिक मतदान झाले होते. ही २०१४ पर्यंतची शेवटची निवडणूक होती ज्यामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले होते. याशिवाय आजपर्यंतची ही एकमेव लोकसभा निवडणूक होती, जेव्हा एका पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :congressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक