उत्तर प्रदेशमध्ये ४०० न्यायाधीशांच्या बदल्या
By Admin | Updated: April 30, 2017 00:47 IST2017-04-30T00:47:55+5:302017-04-30T00:47:55+5:30
उत्तर प्रदेशात ४०० न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात निम्म्याहून अधिक न्यायाधीश अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दर्जाचे आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये ४०० न्यायाधीशांच्या बदल्या
अलाहाबाद : उत्तर प्रदेशात ४०० न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात निम्म्याहून अधिक न्यायाधीश अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दर्जाचे आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल दिनेश कुमार सिंह यांनी शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बदल्या करण्यात आलेल्या न्यायाधीशांमध्ये १९९ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांचा (एडीजी) समावेश आहे.
याशिवाय याच दर्जाच्या आणखी आठ न्यायाधीशांचीही बदली करण्यात आली आहे. हे न्यायाधीश विविध जिल्ह्यांतील जलदगती न्यायालयांत कार्यरत आहेत.
झांसी, बांदा, मुरादाबाद आणि सीतापूर यासारख्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक जिल्ह्याचे सहा अतिरिक्त सत्र न्यायाधीश हलविण्यात आले आहेत.