दिल्लीतील मंगोलपूरीत भीषण आग लागून ४०० झोपड्या खाक
By Admin | Updated: October 19, 2015 09:10 IST2015-10-19T09:08:41+5:302015-10-19T09:10:07+5:30
नवी दिल्लीतील मंगोलपूरी भागातील झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत ४०० झोपड्या जळून खाक झाल्या.

दिल्लीतील मंगोलपूरीत भीषण आग लागून ४०० झोपड्या खाक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - राजधानी दिल्लीतील मंगोलपूरी भागातील झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत ४०० झोपड्या जळून खाक झाल्या. झोपडपट्टीवस्तीतील डीडीए ग्राऊंड भागात रविवारी मध्यरात्री ही भीषण आग लागली, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या २८ गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.