अहमदाबाद - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत राजकारणही तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. भारत गेल्या 40 वर्षांपासून दहशतवादाचे दुखणे झेलत आहे. मात्र आता दहशतवादाला सहन केले जाणार नाही. जर कुणी दहशतवाद्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. तर अशांना घरात घुसून मारू, अशा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. गुजरातमधील अहमदाबाद येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, '' भारत गेल्या 40 वर्षांपासून दहशतवादाचे दुखणे झेलत आहे. मात्र आता दहशतवादाला सहन केले जाणार नाही. जर कुणी दहशतवाद्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. तर अशांना घरात घुसून मारू, एकेका दहशतवाद्याला वेचून टिपणे हेच आमचे धोरण आहे. दहशतवाद्यांना घरात घुसून मारणे हाच आमचा सिद्धांत आहे.''
40 वर्षांपासून दहशतवाद सहन करत आहोत, आता घरात घुसून मारणार - मोदींचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 20:47 IST
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत राजकारणही तापले आहे.
40 वर्षांपासून दहशतवाद सहन करत आहोत, आता घरात घुसून मारणार - मोदींचे आव्हान
ठळक मुद्दे