जम्मूत बस वाहून गेल्यामुळे 40 बेपत्ता
By Admin | Updated: September 5, 2014 03:09 IST2014-09-05T03:09:57+5:302014-09-05T03:09:57+5:30
लष्कराच्या एका जवानासह आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने जम्मू विभागातील पूंछ आणि रियासी जिल्ह्यात ढगफुटी आणि पुरामुळे मरणा:यांची संख्या 13 झाली आहे.

जम्मूत बस वाहून गेल्यामुळे 40 बेपत्ता
जम्मू : लष्कराच्या एका जवानासह आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने जम्मू विभागातील पूंछ आणि रियासी जिल्ह्यात ढगफुटी आणि पुरामुळे मरणा:यांची संख्या 13 झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने काश्मीर प्रशासनाने पाच जिलतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारी सुटी जाहीर केली.
दरम्यान, राजाैरी जिल्ह्यात लगAाची वरात घेऊन जात असलेली बस पुरामुळे गंभीर नदीत वाहून गेल्याने 4क् नागरिक बेपत्ता आहेत. लाम-दारहाल-माऊशेरा मार्ग ओलांडताना ही दुर्घटना झाली. पूंछ जिल्ह्यात आणखी तिघे जण वाहून गेल्याचे वृत्त आहे तर रियासी जिल्ह्यात दोन महिलांनी जीव गमावला. लष्कराचा शिपाई बलवीरसिंग पूंछ येथे बचाव व मदतकार्य सुरू असताना वाहून गेला. ढगफुटीमुळे दरड कोसळून एक बीएसएफ जवान बुधवारी जिवंत गाडला गेला होता.
मुसळधार पावसामुळे पुराचा धोका लक्षात घेता श्रीनगर, पुलवामा, अनंतनाग, कुलगाम आणि शेपियन जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना बंद ठेवण्याचा आदेश दिला. बारामुल्ला आणि बांदीपुरा जिल्हा प्रशासनाने देखील पुढील आदेशार्पयत सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. राज्य सरकारने जम्मू विभागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. या विभागात बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान लष्कराच्या पथकांनी विविध ठिकाणांहून आज 128 नागरिकांचे प्राण वाचवले. आतार्पयत 236 लोकांचे प्राण वाचवण्यात लष्कराला यश आले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे. रामबन, पंथ्याल, खुनी नाला, नशिरी नल्ला आणि शेर बीबी येथे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जम्मू-डोडा आणि भद्रवाह-किश्तवाड दरम्यानचे रस्तेही दरडी कोसळल्याने बंद पडले आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग शुक्रवारी दोन दिवसांच्या दौ:यावर जम्मू-काश्मीरला येत आहेत. सीमेवरील युनिफॉर्म कमांड मुख्यालयातील बैठकीत सिंग सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन काही ठिकाणांना भेटी देतील. (वृत्तसंस्था)
देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर सिंग यांचा हा पहिला जम्मू-काश्मीर दौरा आहे. या भेटीदरम्यान सिंग अधिका:यांची चर्चा करतील आणि स्थलांतरित काश्मिरी पंडितांना परत आणून पुनर्वसन करण्याची संभावनेचा आढावा घेतील. ते प्रवासी नगरला देखील जाणार आहेत.