नवी दिल्ली : ग्रामीण भागातील ग्राहकांची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता प्रसार यामुळे येत्या पाच वर्षात देशातील टेलिकॉम क्षेत्रत 40 लाख नोक:यांची संधी निर्माण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने अडीच लाख गावांना हाय स्पीड ब्रॉडबँडने जोडण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच या क्षेत्रबाबत सकारात्मक चर्चा होऊ लागली आहे.
अभियंते, कुशल तंत्रज्ञ याबरोबरच इंस्टॉलेशन आणि मेंटेनन्स सेवा देण्यासाठी लागणारे कर्मचारी, विक्री, विपणन आणि मनुष्यबळ विभागासाठी लागणा:या कर्मचा:यांच्या मागणीत वाढ होणो अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे. रँडस्टड इंडिया या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. उप्पालुरी यांनी सांगितले की, गेल्या दोन दशकांत टेलिकॉम क्षेत्रत वार्षिक 35 टक्के दराने वाढ होत आहे. या क्षेत्रचा भरभराटीचा काळ मागे पडला असला तरी हे क्षेत्र रोजगाराच्या मोठय़ा संधी देणारे राहणार आहे.
या संस्थेच्या अंदाजानुसार येत्या पाच वर्षात या क्षेत्रत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणो 40 लाख नोक:या उपलब्ध होतील. ग्रामीण भागात फोनचा वाढत असलेला प्रसार आणि मोबाईल आणि इंटरनेट, ब्रॉडबँडचा वाढता प्रभाव यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे या कंपनीचे म्हणणो आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4टीई कनेक्टिव्हिटी या कंपनीच्या मते गेल्या दशकात सर्वाधिक नोक:या देणारे हे क्षेत्र राहिले आहे. 2015 र्पयत या क्षेत्रत 2 लाख 75 हजार कर्मचा:यांची गरज निर्माण होईल, असा अंदाज या कंपनीने व्यक्त केला आहे.