४० भारतीय मच्छीमारांना अटक
By Admin | Updated: February 20, 2016 02:49 IST2016-02-20T02:49:39+5:302016-02-20T02:49:39+5:30
अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पोहोचलेल्या ४0 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा विभागाने अटक केली.

४० भारतीय मच्छीमारांना अटक
अहमदाबाद : अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पोहोचलेल्या ४0 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा विभागाने अटक केली.
या मच्छीमारांच्या सात नौकाही पाकिस्तानने ताब्यात घेतल्या आहेत. आॅक्टोबरपासूनची ही पाचवी घटना असून, या काळात पाकिस्तानने ३५ हून अधिक नौका आणि त्यातील सुमारे २२५ भारतीय मच्छीमारांना पकडले असल्याची माहिती नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष मनीष लोढारी यांनी दिली. पाकने यापूर्वीही अनेकदा भारतीय मच्छीमारांना पकडले असून अनेकजण तेथील कारागृहात आहेत.