संकेश्वर येथील शेतात सापडल्या ४० उखळी तोफा
By Admin | Updated: March 8, 2016 21:44 IST2016-03-08T21:44:39+5:302016-03-08T21:44:39+5:30
कर्नाटकात संकेश्वर येथे शेतातील एका विहीरीत ४० उखळी तोफा सापडल्या आहेत. पोलिसांनी या सर्व तोफा ताब्यात घेतल्या आहेत.

संकेश्वर येथील शेतात सापडल्या ४० उखळी तोफा
ऑनलाइन लोकमत
संकेश्वर, दि. ८ - कर्नाटकात संकेश्वर येथे शेतातील एका विहीरीत ४० उखळी तोफा सापडल्या आहेत. पोलिसांनी या सर्व तोफा ताब्यात घेतल्या आहेत.
प्राथमिक चौकशीतून १९७० च्या दशकात भारतीय लष्कराने या उखळी तोफाचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस अधीक्षक बी.आर.रवीकांत गोडा यांनी मराठा लाईट इनफॅंटरी रेजीमेंट केंद्राला या उखळी तोफा या भारतीय लष्कराच्या असल्याची खातरजमा करण्यास सांगितले आहे.