शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळापळ; बंद केले पीओकेतील 4 दहशतवादी तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 13:27 IST

भारताच्या आक्रमक बाण्याची पाकिस्तानला धास्ती

श्रीनगर: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यानं पाकिस्तान चांगलाच धास्तावला आहे. भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केल्याचा परिणाम पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसू लागला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील चार दहशतवादी तळ बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला उत्तर देत असताना भारतीय लष्कराकडून दहशतवादी तळांवर हल्ले केले जाण्याची भीती पाकिस्तानला वाटते. त्यामुळेच पाकिस्ताननं हे पाऊल उचललं आहे. गुप्ततर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्चला पाकव्याप्त काश्मीरमधील निकियालमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अधिकारी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अशफार बडवाल उपस्थित होते. निकियाल भाग काश्मीरमधील राजौरी सेक्टरजवळ येतो. निकियालमध्ये असणारे चार दहशतवादी तळ बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हे तळ बडवालकडून चालवले जातात. त्यामुळेच तळ बंद करण्याच्या सूचना आयएसआयकडून थेट त्यालाच देण्यात आल्या.पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या गोळीबाराला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. भारताकडून दहशतवादी तळांवर हल्ला केला जाऊ शकतो, या भितीनं पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकव्याप्त काश्मीरमधील निकियाल आणि कोटलीमधील प्रत्येकी एक-एक दहशतवादी तळ बंद करण्याचा घेण्यात आला. हा परिसर काश्मीरच्या सुंदरबनी आणि राजौरी सेक्टरपासून अतिशय जवळ आहे. निकियाल, कोटली सोबतच पाला आणि बाघामधील दहशतवादी तळदेखील बंद करण्याच्या सूचना आयएसआयकडून करण्यात आल्या आहेत. हे तळ जैश-ए-मोहम्मदकडून चालवले जात होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा