४ रुपयांनी घेतला दोघांचा जीव!
By Admin | Updated: June 14, 2015 02:17 IST2015-06-14T02:17:55+5:302015-06-14T02:17:55+5:30
अवघ्या ४ रुपयांसाठी झालेल्या संघर्षात दोन ठार तर इतर दोघे जखमी झाल्याची घटना यमुनेपलीकडे दुर्गम भागात घडली.

४ रुपयांनी घेतला दोघांचा जीव!
अलाहाबाद (उ. प्र.) : अवघ्या ४ रुपयांसाठी झालेल्या संघर्षात दोन ठार तर इतर दोघे जखमी झाल्याची घटना यमुनेपलीकडे दुर्गम भागात घडली.
वशिष्ठ दुबे यांच्या पीठगिरणीवर शुक्रवारी दळणासाठी गेलेल्या रजत नामक युवकाने ४ रुपये कमी दिले होते. यावरून दुबेंचा मुलगा सुरेश व रजत यांच्यात भांडण झाले. चक्की मालकाचा दुसरा मुलगा राकेश याने शस्त्राने रजतवर हल्ला केला.
रजतवर हल्ल्याची वार्ता मिळताच त्याच्या नातेवाईकांनी चक्कीला घेराव घातला. त्यानंतर संतप्त राकेशने जमावावर गोळीबार केला. यात राहुल आणि आशू (दोघेही १८ वर्षांचे) यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)
घटनेनंतर सशस्त्र पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. तत्पूर्वी संतप्त जमावाने पिठाची गिरणी, गिरणी मालकाचे घर आणि गाडीला आग लावली. (वृत्तसंस्था)