शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 19:28 IST

"आम्ही आगामी निवडणुकीत किमान 40 जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत."

कर्नाटकमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 40 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे. एवढेच नाही, तर भाजपचे 4 ते 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करू शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी केला आहे. हरी आर म्हणाले, "आम्ही आगामी निवडणुकीत किमान 40 जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत. बेंगळुरूचे (माजी) महापौरही लवकरच आमच्या पक्षात सामील होऊ शकतात."

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 14 जागांवर निवडणूक लढवली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता काढून घेतली असून त्याला प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होनार असून 13 मे रोजी मतमोजनी होईल.

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर -कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केली. यात ४३ मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेत. १२४ उमेदवारांची यादी काँग्रेसने २५ मार्चला जारी केली होती. यानंतर ४२ उमेदवारांची यादी ६ एप्रिलला जारी करण्यात आली होती. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार डीके शिवकुमार कनकापुरा आणि सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सिद्धरामय्या यांनी कोलारमधून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली होती. परंतू तिथून कोथुर्जी मंजुनाथ यांना उमेदवारी देण्य़ात आली आहे. 

कर्नाटकात नाराजांचा खेळ रंगला! -काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात उत्तर कर्नाटकातील भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथनीमधून तिकीट देण्यात आले आहे. सवदी यांनी भाजपने तिकीट न दिल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय, भाजपाने देखील 11 विद्यमान आमदारांना घरी बसवून काँग्रेस, निजदमधून आलेल्या काही जणांना तिकीट दिले आहे. तर सत्ता हस्तगत करण्यासाठी ज्य़ा नेत्यांनी मदत केली त्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. यामुळेच सवदी नाराज झाले होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा