शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या प्रवासावर ३९३ कोटी खर्च; माहिती अधिकारात उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 06:00 IST

अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या गेल्या पाच वर्षांतील परदेशी व देशांतर्गत प्रवासांवरील खर्चाची माहिती मागितली होती.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षांत केलेल्या परदेश व देशांतर्गत प्रवासावर ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाला. विदेश दौऱ्यांवर २९२ कोटी रुपये, तर देशांतर्गत प्रवासावर ११० कोटी रुपये खर्च झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळविली आहे.कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासावर गेल्या पाच वर्षांत २६२ कोटी ८३ लाख १० हजार ६८५ रुपये , तर देशांतर्गत प्रवासांवर एकूण ४८ कोटी ५३ लाख ९ हजार ५८४ रुपये खर्च झाले. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर २९ कोटी १२ लाख ५ हजार १७० रुपये, तर देशांतर्गत प्रवासांवर ५३ कोटी ९ लाख २६ हजार ४५१ रुपये खर्च झाले आहेत.अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या गेल्या पाच वर्षांतील परदेशी व देशांतर्गत प्रवासांवरील खर्चाची माहिती मागितली होती. त्यांना मिळालेल्या माहिती कॅबिनेट व राज्यमंत्र्यांच्या परदेशी आणि देशांतर्गत प्रवासांवर झालेल्या खर्चाचा समावेश आहे. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्यांवरील खर्चाचा तपशील नाही. मात्र सरकारने प्रत्येक वर्षी कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या दौºयांवर झालेल्या वर्षवार तपशील दिला आहे.अनिल गलगली म्हणाले की, पंतप्रधानांसह कोणत्या मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी किती प्रवास केला आहे, त्याचे विवरण देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. याचा तपशील मिळणे आवश्यक आहे.

२,0२१ कोटींचे काय?डिसेंबर, २०१८ मध्ये राज्यसभेतील सरकारने पंतप्रधानांचे विदेश दौºयांसाठी २,0२१ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले होते. यामध्ये चार्टड फ्लाइट, विमानाची देखभाल व दुरुस्ती व पंतप्रधानांच्या दौºयादरम्यान पुरविण्यात येणाºया हॉटलाइन सुविधेचा उल्लेख होता, पण पंतप्रधानांच्या खर्चाची ही माहिती गलगली यांना सरकारने दिलेली नाही. प्रत्येक मंत्र्यांच्या दौºयाबाबत सविस्तर माहिती न दिल्याबद्दल गलगली यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी