शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

हृदयस्पर्शी! घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण हार नाही मानली; रिक्षा चालवून 'तो' देतोय मुलांना शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 17:14 IST

38 year old homeless rickshaw puller teach children on roadside : आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी धडपड आणि अपार कष्ट करणाऱ्या एका बापमाणसाची गोष्ट समोर आली आहे.

नवी दिल्ली - जगण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागतो. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण यातचही अनेक जण हार न मानता आपल्या जिद्दीच्या जोरावर संकटावर मात करतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी धडपड आणि अपार कष्ट करणाऱ्या एका बापमाणसाची गोष्ट समोर आली आहे. घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण त्याने हार नाही मानली. रिक्षालाच आपलं घर बनवून तो आता मुलांना शिक्षण देत आहे. गणेश साहू असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. 

ज्यांच्याकडे आपल्या मुलांसाठी डोक्यावर छप्पर नाही पण तरीही ते आपल्या मुलांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी झटत आहेत. आपल्या मुलांचं पालनपोषण करता यावं, त्यांचं पोट भरता यावं म्हणून ते रिक्षा चालवण्याचं काम करतात. यासोबतच मुलांना देखील स्वत:च शिकवतात. भास्कर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, गणेश साहू यांना दोन मुलं आहेत. ते आधी एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते. मात्र अतिक्रमणामध्ये त्यांची झोपडी तुटली. ज्यानंतर ते बेघर झाले. आता रिक्षाच त्यांच्यासाठी सर्वकाही आहे. 

रिक्षालाच बनवलं आपलं घर 

गणेश साहू यांनी रिक्षालाच आपलं घर केलं असून ते आपल्या दोन्ही मुलांसोबत तिथेच राहतात आणि रिक्षा चालवून त्यांचं पोट भरतात. घर नसल्याने त्यांची पत्नी देखील त्यांना आणि दोन्ही मुलांना सोडून निघून गेली. अनेक समस्यांचा त्यांना सध्या सामना करावा लागत आहे. मात्र तरीदेखील ते दु:खी झालेले नाहीत. त्यांनी आशा सोडलेली नाही. ते आपल्या मुलांसाठी खूप प्रयत्न करत असून त्यांना उत्तम शिक्षण देता यावं. त्यांचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून कष्ट करत आहेत. 

लेकरांच्या शिक्षणासाठी करतोय धडपड

गणेश यांना सात वर्षांचा अरूण नावाचा तर 9 वर्षांची गंगा नावाची मुलगी आहे. ते एकटेच या दोन्ही मुलांचा उत्तम सांभाळ करत आहेत. गणेश साहू यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची आहे. त्यामुळे ते दोन्ही मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत. फी भरण्यासाठी देखील त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पण तरी ते निराश झाले नाहीत. ते स्वत: आपल्या मुलांना शिकवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहेत. रिक्षा चालवून आल्यानंतर ते मुलांना वेळ देतात आणि शिकवतात. 

टॅग्स :Educationशिक्षणIndiaभारत