३८ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर
By Admin | Updated: August 15, 2015 00:27 IST2015-08-15T00:27:30+5:302015-08-15T00:27:30+5:30

३८ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर
>मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहविभागाने देशभरातील तब्बल ८२४ पोलीस अधिकार्यांची विविध पुरस्कारांसाठी निवड केली. त्यापैकी महाराष्ट्रातून अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर, फौजदार अशोक जोंधळे यांच्यासह अन्य ३६ पोलिसांना चांगल्या सेवेसाठी पोलीस पदक जाहीर केले. .................................................................................राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यांच्यासोबत हिंगोलीतील बालपूर पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक जोंधळे यांना हा मान मिळाला आहे. त्यात मुंबईतील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोहर धनावडेंसह नऊ जणांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)