शहरातील ३६ चौक मृत्यूचे सापळे
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:10+5:302015-02-18T00:13:10+5:30
शहरातील ३६ चौक मृत्यूचे सापळे

शहरातील ३६ चौक मृत्यूचे सापळे
श रातील ३६ चौक मृत्यूचे सापळे-वाहतूक शाखांकडे अपघात स्थळांची नोंद : मात्र उपाययोजनांकडे दुर्लक्ष -लोकमत स्पेशल(चौकातील फोटो रॅपमध्ये आहे)सुमेध वाघमारे नागपूर : आधीच अरु ंद चौक, त्यात अनधिकृत व्यावसायिकांनी व्यापलेला फुटपाथ आणि रस्त्याच्या दुर्तफा पार्किंगमुळे शहरातील ३६ चौक अपघाती मृत्यूचे सापळे ठरले आहे. विशेष म्हणजे याची नोंद संबंधित वाहतूक शाखेकडेही आहे, परंतु चौकात अपघात रोखण्याच्या काहीच उपाययोजना अथवा दिशादर्शक सूचनांचे साधे फलकही दर्शविण्यात आले नसल्याचे वास्तव आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षात १ हजार १५१ अपघात झाले असून यात २८१ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या ६ हजार २५५ अपघातात १हजार ४३३ जणांचा मृत्यू झाला आहेत. शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही वाहतूक प्रशासनाचे याकडे विशेष लक्ष नसल्याचे चित्र आहे. -अपघात चौक म्हणून नोंद असतानाही पोलीस नाही गेल्यावर्षी पश्चिम, उत्तर, दक्षिण, इंदोरा व एमआयडीसी वाहतूक शाखेच्या तुलनेत पूर्व वाहतूक शाखेंतर्गत सर्वात जास्त म्हणजे १३८७ अपघात झाले आहेत. या शाखेंतर्गंत मेडिकल चौक ते अजनी रेल्वे ब्रिज, म्हळगीनगर चौक, बेसा चौक ते चामट चक्की चौक, रामेश्वरी ते शताब्दीनगर आदी अपघाताचे स्थळ म्हणून नोंद आहे. परंतु या मार्गावर वाहतुकीच्या दिशानिर्देशांचे कुठेही फलक नाही. महत्त्वाचे म्हणजे, मेडिकल चौक ते अजनी रेल्वे ब्रिज चौक मार्गावर एकाही वाहतूक पोलिसाची ड्युटी लावली जात नाही. अशीच स्थिती इतरही शाखेच्या अपघात स्थळांच्या चौकातील आहे.