शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडिया? 2014 पासून देशात 350 पेक्षा अधिकवेळा इंटरनेट सेवा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:48 IST

2018 मध्ये जगभरातील 67 टक्के इंटरनेट बंदीच्या घटना एकट्या भारतात

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाची घोषणा केली होती. मात्र २०१४ पासून देशात आतापर्यंत ३५७ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षात सर्वाधिक १३४ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. गेल्या वर्षात जगभरात झालेल्या इंटरनेट बंदीच्या घटनांची आकडेवारी पाहिल्यास त्यातील तब्बल ६७ टक्के घटना भारतात घडल्या आहेत. तर चालू वर्षात आतापर्यंत ९३ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला. शंभरपेक्षा अधिक दिवस जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद होती. आता सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जवळपास देशभरात आंदोलनं सुरू आहेत. आसामसह ईशान्य भारतामधून या आंदोलनांना सुरुवात झाली. या आंदोलनांची तीव्रतादेखील जास्त आहे. त्यामुळेच ईशान्य भारतामधील बऱ्याच भागांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. २०१४ पासून देशभरात करण्यात इंटरनेट बंदीची आकडेवारी इंडिया टुडेनं प्रसिद्ध केली आहे. यानुसार २०१४ पासून आतापर्यंत देशात ३५७ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. २०१४ मध्ये सहावेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. यानंतर इंटरनेट सेवा खंडित करण्याचं प्रमाण दुपटीनं वाढू लागलं. २०१५ मध्ये १४ वेळा, २०१६ मध्ये ३१ वेळा, २०१७ मध्ये ७९ वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. २०१८ मध्ये हे प्रमाण थेट १३४ वर गेलं. चालू वर्षात १५ डिसेंबरपर्यंत देशात ९३ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. 

टॅग्स :InternetइंटरनेटJammu Kashmirजम्मू-काश्मीर