सरकारी नोकऱ्यांत महिलांना ३५ टक्के आरक्षण
By Admin | Updated: January 21, 2016 03:18 IST2016-01-21T03:18:14+5:302016-01-21T03:18:14+5:30
बिहारमधील नितीशकुमार सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

सरकारी नोकऱ्यांत महिलांना ३५ टक्के आरक्षण
पाटणा : बिहारमधील नितीशकुमार सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पाटणा येथे मंगळवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला आरक्षणाचा हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी २० जानेवारी २०१६ पासूनच केली जाणार आहे.
हे ३५ टक्के महिला आरक्षण राखीव आणि खुल्या प्रवर्गासह सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू राहील. बिहारमध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस उपनिरीक्षक या पदांकरिताच ३५ टक्के महिला आरक्षण आधीपासूनच लागू आहे. याशिवाय प्राथमिक शाळा शिक्षक आणि पंचायती राज व्यवस्थेतही महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)