तेलंगणात उष्माघातानं 35 लोकांचा मृत्यू, सरकारकडून अलर्ट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 18:30 IST2016-04-13T18:30:04+5:302016-04-13T18:30:04+5:30
उष्माघातामुळे तेलंगणा राज्यात जवळपास 35 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

तेलंगणात उष्माघातानं 35 लोकांचा मृत्यू, सरकारकडून अलर्ट जारी
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद दि. १३- तेलंगणातल्या नालगोंडा आणि रमागुंडममध्ये काल सर्वाधिक म्हणजेच 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. या उष्माघातामुळे तेलंगणा राज्यात जवळपास 35 लोकांना जीव गमवावा लागला आहे. सरकारनं राज्यभरात हाय अलर्टही जारी केलं आहे.
सरकारनं अनेक जिल्ह्यांना वाढत्या हवामानाच्या बदलावर काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे. आज 24 तासांमध्ये तेलंगणात 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. आम्ही सर्व जिल्हाधिका-यांना याबाबत अलर्ट जारी केलं आहे. दुपारनंतर लोकांनी शक्यतो बाहेर पडण्याची जोखीम उचलू नये, अशी सूचना सरकारचे महसूल सचिव बी. आर. मीना यांनी दिली आहे.
गावच्या पाणी विभागालाही पाण्याचा मुबलक पुरवठा करून ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहे. जवळपास या उष्माघातामुळे 35 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मीना यांनी दिली आहे. मात्र आठवड्याभरापूर्वी राज्य सरकारनं 66 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र मीना यांनी 35 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. सरकारनं बांधकाम करणा-या मजुरांना उन्हात काम करण्यास मज्जाव केला आहे.