बिहारमध्ये बस अपघातात 35 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: September 19, 2016 20:20 IST2016-09-19T20:14:23+5:302016-09-19T20:20:49+5:30
मधुबनी जिल्ह्यातील बसैथ गावाजवळ बस तलावात कोसळून झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

बिहारमध्ये बस अपघातात 35 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १९ - मधुबनी जिल्ह्यातील बसैथ गावाजवळ बस तलावात कोसळून झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी प्रवासी बसमधून 50 जण प्रवास करत होते. बसैथ गावाजवळ असलेल्या सुंदर कुंडामध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास बस कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एक सायकल स्वार आपला मार्ग सोडून बस समोर आला. त्याला वाचविण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. क्रेनच्या साहाय्याने ही बस काढण्यात येत आहे.