शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

Bharat Jodo Yatra: काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत ३५ मिनिटे भाषण, राहुल गांधी यांचा भाजप, संघावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 08:11 IST

Bharat Jodo Yatra: ‘भारत जोडो यात्रा भारताची उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये जतन करण्याच्या उद्देशाने होती.

नवी दिल्ली : ‘भारत जोडो यात्रा भारताची उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये जतन करण्याच्या उद्देशाने होती. देशातील उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्याकडून आक्रमण होत आहे,’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेच्या समारोपप्रसंगी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमध्ये संपली. शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये समारोप समारंभात राहुल गांधी यांनी ३५ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. 

त्यांना दु:ख कळेल कसे?राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, इथे आम्ही ४ दिवस फिरलो, भाजपचा कोणताही नेता असे फिरू शकणार नाही याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर त्यांना भीती वाटते म्हणून.’ ‘मला जम्मू-काश्मीरच्या लोकांना आणि लष्कर-सुरक्षा दलांना काही सांगायचे आहे. मला हिंसा समजते. मी हिंसा अनुभवली आहे. ज्याने हिंसा पाहिली नाही त्यांना हे समजणार नाही. काश्मिरी व सैनिकांप्रमाणेच मी माझ्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख सहन केले. ही वेदना मोदी-शहा समजू शकत नाही,’ असे भावुक भाषण राहुल गांधी यांनी केले. यावेळी प्रियांका गांधी, मेहबूबा मुफ्तींची भाषणे झाली.

माझ्यावर हँडग्रेनेड फेकले नाही, प्रेम दिले‘मी जम्मूहून काश्मीरला जात होतो तेव्हा मला इशारा देण्यात आला की, तुमच्यावर ग्रेनेड फेकले जाईल. मी म्हणालो, या टी-शर्टचा रंग बदला, लाल करा. जे होईल ते पाहू; पण मला जे वाटले तेच झाले. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी माझ्यावर हँडग्रेनेड फेकले नाही, त्यांनी मला उघड्या हातांनी प्रेम दिले,’ असे राहुल गांधी म्हणाले. 

असे फोन कॉल थांबावेत...‘मला हिंसा समजते. आजीला गोळी घातली ती जागा मी पाहिली, तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. प्रियजन गमावले की हृदयात काय होते, त्यांना फोन आल्यावर कसे वाटते, हे मला, माझ्या बहिणीला समजते. असे फोन कॉल्स थांबले पाहिजेत, हेच आमचे उद्दिष्ट आहे, या देशाचा पाया तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात एकत्र उभे राहू या,’ असेही राहुल गांधी म्हणाले. 

हिमवर्षावाचा आनंद श्रीनगरमध्ये सकाळपासून बर्फवृष्टी झाली. पण कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. भाषणादरम्यान बर्फवृष्टी यामुळे राहुल गांधींनी ‘फेरन’ ही काश्मिरी टोपी घातली. समारोपानंतर राहुल व प्रियांका यांनी एकमेकांवर बर्फ फेकत आनंद लुटला.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस