३५ लाखांचा मुद्देमाल पकडला

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:14+5:302015-08-27T23:45:14+5:30

(फोटो)

35 lakhs arrested | ३५ लाखांचा मुद्देमाल पकडला

३५ लाखांचा मुद्देमाल पकडला

(फ
ोटो)
३५ लाखांचा मुद्देमाल पकडला
रेतीची अवैध वाहतूक : चार ट्रक जप्त, सहा जणांना अटक
सावनेर : तालुक्यातील खापा व केळवद पोलिसांनी सोमवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक पकडले. यात सहा जणांना अटक करण्यात आली असून, २३ हजार ५०० रुपये किमतीच्या रेतीसह एकूण ३५ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
खापा पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बडेगाव शिवारात कारवाई केली. यात एमएच-२८/एच-१२३२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये विना रॉयल्टी रेती आढळून येताच रेती व ट्रक जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये सहा हजार रुपये किमतीच्या सहा ब्रास रेतीसह १० लाख ६ हजार रुपये कि मतीचा मुद्देमाल जप्त करून रामदास जगुलाल सर्याम रा. सिंदेवाणी मध्यप्रदेश व देवेंद्र राधेलाल धनोरिया रा. लालबाग मध्य प्रदेश या दोघांना अटक केली.
खापा पोलिसांनी सोमवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास टेंभुरडोह शिवारात कारवाई करून रेतीची विना रॉयल्टी वाहतूक करणारे एमएच-२८/जी-२५८५ व एमएच-२८/एच-८८८८ क्रमांकाचे दोन ट्रक पकडले. यात १० ब्रास रेतीसह एकूण २५ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, विलास मिराजी युवनाते रा. कुट्टम, जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश, बबलू नारायण डोंगरे रा. अंबाझरी, मध्य प्रदेश व चेतन नारायण चढ्ढा रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश या तिघांना अटक करण्यात आली.
केळवद पोलिसांनी ढालगाव खैरी शिवारात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. त्यात एमएच-३१/सीबी-९९७२ क्रमांकाचा ट्रक व एमएच-३२/क्यू-३९१९ क्रमांकाच्या टिप्परमध्ये विना रॉयल्टी रेती असल्याचे निदर्शनास येताच ७ हजार ५०० रुपये किमतीच्या ७.५ ब्रास रेतीसह ट्रक व टिप्पर जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये ९ लाख १५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, हनुमंत गणपत चापले रा. कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धा यास अटक करण्यात आली. या प्रकरणी खापा व केळवद पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***

Web Title: 35 lakhs arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.