शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

३४ लाखांच्या बसमध्ये शिपाई करतात आराम

By admin | Updated: May 22, 2017 03:24 IST

मध्यप्रदेशचे तत्कालीन वनमंत्री विजय शाह यांनी वन विभागासाठी ३४ लाख रुपयांची बस खरेदी केली खरी; पण आतापर्यंत या बसचा उपयोगच होऊ शकला नाही

भोपाळ : मध्यप्रदेशचे तत्कालीन वनमंत्री विजय शाह यांनी वन विभागासाठी ३४ लाख रुपयांची बस खरेदी केली खरी; पण आतापर्यंत या बसचा उपयोगच होऊ शकला नाही. या काळात वन विभागाचे तीन मंत्री बदलले आहेत. सध्या वन विभागाचे शिपाई या बसमध्ये आराम करीत आहेत. कडक उन्हाळ्यात एसी आॅन करून बसमधील सोफ्यावर हे शिपाई आराम करतानाचे चित्र दिसत आहे. २००८ मध्ये ही बस खरेदी करण्यात आली होती. तत्कालीन वनमंत्री विजय शाह ही बस घेऊन खंडवा येथे गेले होते. तेव्हा लक्षात आले की, ही बस वनांचलमध्ये चालू शकत नाही. कारण, खड्डे आल्यानंतर बस खालच्या बाजूने जमिनीला लागते. अशा परिस्थितीत बस परत करणेही शक्य नव्हते. अधिकाऱ्यांकडूनही ही बस लपविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. दर दोन महिन्याला या बसची जागा बदलण्यात येत आहे. आता ही बस इको टुरिझमसाठी देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस आता वनमंत्री डॉ. गौरीशंकर शेजवार यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. या बसने ते जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. बसच्या सोफ्यांचे कुशन कव्हरही बदलण्यात आले आहेत. एअर कंडिशनचेही काम करण्यात आले आहे. या बसमध्ये दोन केबिन, किचनही आहे. एकूणच काय तर सरकारसाठी ही बस ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी झाली आहे.