शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

गोकाकमध्ये ३४ लाखाच्या बनावट नोटा जप्त, सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 16:00 IST

बेळगाव : गोकाक तालुक्यातील कडबगट्टी येथे बनावट नोटा बनवून त्या चलनात आणून दुप्पट करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध ...

बेळगाव : गोकाक तालुक्यातील कडबगट्टी येथे बनावट नोटा बनवून त्या चलनात आणून दुप्पट करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन बेकायदेशीर कारवाईप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी सांगितले.मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी ते बोलत होते. गोकाक-बेळगाव मार्गावरील कडबगट्टीतून जात असलेली कार पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अडवली, यादरम्यान हा प्रकार उघड झाला. कारमधून बनावट नोटांची वाहतूक करण्यात येत होती. या कारवाईत १०० रुपयांच्या ३०५ आणि ५०० रुपयांच्या ६,७९२ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.या कारवाईत अरभावीमधील अनवर महंमद सलीम यादवाड (वय २६), महालिंगपूर येथील सद्दाम मुसा यडहळ्ळी (२७), डुंडाप्पा महादेव ओनशेवी (२७), रवी चन्नाप्पा ह्यागाडी (२७), विठ्ठल हणमंत होसकोटी (२९) मल्लप्पा यल्लाप्पा कुंबाळी (२९) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान गोकाक, महालिंगपूर, मुधोळ, यरगट्टी, हिडकल धरण, बेळगाव, धारवाड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चलनी नोटांच्या बदल्यात बनावट नोटा वितरण केल्याची कबुली दिली आहे. चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अरभावी गावातील अन्वर यादव याच्या घरातून बनावट कागदपत्रे, संगणक, प्रिंटर आणि मोबाइल फोन आदी उपकरणे जप्त केली आहेत. उघड झालेल्या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. या प्रकरणाच्या खोलवर तपासासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबत गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावCrime Newsगुन्हेगारी