शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

२०० जागांवर ३२९५ उमेदवार; काँग्रेस, भाजपाला बंडखोरीने ग्रासले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 05:27 IST

राजस्थानात विधानसभेच्या २०० जागांसाठी एकूण ३२९५ अर्ज दाखल झाले आहेत. एकट्या जयपूर शहर व जिल्ह्यातील १९ जागांसाठी ५०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

- सुहास शेलार

जयपूर : राजस्थानात विधानसभेच्या २०० जागांसाठी एकूण ३२९५ अर्ज दाखल झाले आहेत. एकट्या जयपूर शहर व जिल्ह्यातील १९ जागांसाठी ५०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहेत. काँग्रेसच्या बंडखोरांची संख्या ५0 च्या आसपास आहे. त्यात ४ माजी मंत्री आणि सहा माजी आमदार आहेत. गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक व राजीव सातव हे तिन्ही नेते या बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि अविनाश पांडे या नेत्यांनीही या बंडखोरांना भेटून त्यांना समजावण्याचे प्रयत्न चालवले आहेत.उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाच्या ४ मंत्री व अनेक आमदारांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्यासह उमेदवारी न मिळालेल्या भाजपाच्या किमान ३0 जणांनी अपक्ष म्हणून उभे राहून भाजपाच्या अधिकृत उमेदवारांपुढेच आव्हान निर्माण केले आहे. मतांचे विभाजन रोखण्यासाठी बंडखोर उमेदवारांची मनधरणी करून, त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनवणी सुरू आहे. स्वत: वसुंधरा राजे, प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी, अविनाश राय खन्ना हे या बंडखोरांना समजावत आहेत. भाजपाने यंदा ४ मंत्री व ६0 आमदारांना उमेदवारी दिलेली नाही.श्रीगंगानगर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतून १०९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. शिवाय हनुमानगड जिल्ह्यातील पाच जागांसाठी ७३, बिकानेरच्या सात जागांसाठी ११४, चुरु जिल्ह्यातील सहा जागांसाठी १०२, झुंनझुनूच्या सात जागांसाठी १०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.सिकर जिल्ह्याच्या आठमतदारसंघांतून १४०, अलवरच्या ११ जागांसाठी १९०, तर भरतपूरच्या सात जागांसाठी १०३ अर्ज दाखल झाले.जोधपूर जिल्ह्यातही १० जागांसाठी १६६ अर्ज दाखल झाले आहेत. राजपुतांचा प्रभाव असलेल्या चितौडगड जिल्ह्यातील पाच जागांसाठी ६९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत....या उमेदवाराविरुद्ध पैसे वाटल्याचा गुन्हाआपल्या वाचाळपणामुळे नेहमी चर्चेत असलेले आमदार ज्ञानदेव अहुजा यांच्याविरुद्ध मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ते जयपूरच्या संगनेर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत आहेत.अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी मोठी रॅली काढली. यावेळी त्यांनी खिशातून १०० रूपयांच्या नोटा काढून रॅलीत सहभागी झालेल्यांना वाटले.हा व्हिडिओ व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने बनीपार्क पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूक