गेल्या वर्षभरात ३२ हजार बलात्काराच्या घटना
By Admin | Updated: April 27, 2016 16:53 IST2016-04-27T16:32:39+5:302016-04-27T16:53:25+5:30
गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये देशभरात जवळजवळ ३२, ०७७ बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची माहिती राज्यसभेत बुधवारी देण्यात आली.

गेल्या वर्षभरात ३२ हजार बलात्काराच्या घटना
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये देशभरात जवळजवळ ३२, ०७७ बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची माहिती राज्यसभेत बुधवारी देण्यात आली.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या अहवालानुसार, देशात २०१५ मध्ये ३२, ०७७ बलात्काराच्या घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे, तर यामधील जवळजवळ १७०६ घटना ह्या सामूहिक बलात्काराच्या असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई चौथरी यांनी राज्यसभेत दिली.
दरम्यान, केंद्र सरकारने बलात्कार पिडीतांच्या मदतीसाठी एक योजना आखली असून त्यासाठी सुरुवातीला २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे.