गणेशवाडी भाजीमार्केटमधील ३१६ ओट्यांचा फेरलिलाव १५२ ओट्यांना प्रतिसाद : दहा लाखांची कमाई

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:16+5:302015-07-16T15:56:16+5:30

नाशिक : महापालिकेने गणेशवाडी येथे उभारलेल्या भाजीमार्केटमधील ४६८ पैकी १५२ ओट्यांना लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद मिळाल्याने त्यातून पालिकेला दहा लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, तहकूब करण्यात आलेल्या ३१६ ओट्यांसाठी लवकरच फेरलिलाव केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. पहिल्या लिलाव प्रक्रियेत १५२ ओट्यांना प्रतिसाद मिळाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडलेले गणेशवाडी भाजीमार्केट ग्राहकांच्या गर्दीने गजबजणार आहे.

316 Pulses of Ganeshwadi Vegetable Market Releases | गणेशवाडी भाजीमार्केटमधील ३१६ ओट्यांचा फेरलिलाव १५२ ओट्यांना प्रतिसाद : दहा लाखांची कमाई

गणेशवाडी भाजीमार्केटमधील ३१६ ओट्यांचा फेरलिलाव १५२ ओट्यांना प्रतिसाद : दहा लाखांची कमाई

शिक : महापालिकेने गणेशवाडी येथे उभारलेल्या भाजीमार्केटमधील ४६८ पैकी १५२ ओट्यांना लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद मिळाल्याने त्यातून पालिकेला दहा लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, तहकूब करण्यात आलेल्या ३१६ ओट्यांसाठी लवकरच फेरलिलाव केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. पहिल्या लिलाव प्रक्रियेत १५२ ओट्यांना प्रतिसाद मिळाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडलेले गणेशवाडी भाजीमार्केट ग्राहकांच्या गर्दीने गजबजणार आहे.
महापालिकेने गोदाघाटावरील भाजीबाजार हटविण्यासाठी व तेथील विक्रेत्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध व्हावी याकरिता सुमारे ६ कोटी रुपये खर्चून गणेशवाडी येथे भाजीमार्केट उभारले होते. परंतु, गोदाघाटावरील विक्रेत्यांनी मार्केटमध्ये जाण्यास नकार दिल्याने मार्केट अनेक वर्षे धूळखात पडून होते. भाजीबाजार भरत नसल्याने या मार्केटचा ताबा नंतर भिकार्‍यांनी घेतला होता. दरम्यान, न्यायालयाने गोदाघाटावरील भाजीमार्केट हटविण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांची लिलावप्रक्रिया मागील आठवड्यात राबविली. या लिलावात सहभागी होण्यार्‍या विक्रेत्यांना पाच हजार रुपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक होते. त्यानुसार लिलावात १५२ ओट्यांना बोली बोलली जाऊन महापालिकेला महिनाभराचे भाडे २ लाख ३२ हजार ४३० रुपये प्राप्त झाले, तर अनामत रकमेच्या माध्यमातून ७ लाख ६० हजार रुपये खजिन्यात जमा झाले. उर्वरित ३१६ ओट्यांना मागणीच आली नसल्याने त्यांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला. आता या शिलकी ओट्यांसाठी पुन्हा एकदा लवकरच लिलावप्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, ज्या १५२ ओट्यांचा लिलाव झाला त्या विक्रेत्यांनी कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता केल्यानंतर संबंधितांना मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याअनुषंगाने सोयी-सुविधाही पुरविल्या जाणार आहेत.
इन्फो
गणेशवाडी भाजीमार्केटमध्ये १५२ ओट्यांसाठी झालेल्या लिलावात सर्वाधिक बोली २ हजार रुपये मासिक भाडे इतकी बोलली गेली. दीडशे का होईना विक्रेत्यांचा प्रतिसाद लाभल्याने पडित असलेले मार्केट ग्राहकांच्या गर्दीने गजबजणार असून, त्यामुळे महापालिकेचाही उत्साह दुणावला आहे. महापालिकेने त्यासाठी विक्रेत्यांना प्राथमिक मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. मार्केटमध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, ओट्यांचा आकार १.९० मीटर हा खूपच कमी असल्याने भाजीपाला विक्री कसा करायचा, हा प्रश्न अनेक विक्रेत्यांना पडला आहे. महापालिकेने ओट्यांचा आकार वाढवावा, अशी एक मागणी होऊ लागली आहे.

Web Title: 316 Pulses of Ganeshwadi Vegetable Market Releases