दाभा येथील ३१ भूखंड जप्त
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:11+5:302015-02-14T23:52:11+5:30

दाभा येथील ३१ भूखंड जप्त
>फोटो आहे...धरमपेठ झोनची कार्यवाही : १.४० कोटींचा मालमत्ता कर थकीतनागपूर : महापालिकेच्या धरमपेठ झोनने मालमत्ता कर थकीत असल्याने दाभा येथील आकांशी को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील ३१ भूखंड जप्त केले आहेत. थकबाकी न भरल्यास या भूखंडांचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कर व करवसुली विभागाने मालमत्ता करवसुलीची मोहीम सुरू केली आहे. आकांशी को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील ३१ भूखंडधारकांकडे १.४० कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने ही कार्यवाही करण्यात आली.झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे यांच्या मार्गदर्शनात कर निर्धारकांनी ही कार्यवाही केली. संपत्ती कर न भरल्यास अजय कोले, दत्तात्रय भाटी, स्वाती सेलुकर, उमा बालकृष्णन, स्मिता लोणारे, राम देशपांडे, कांचन कासलकर, शशीकांत सेलुकर, सरोज थापर, मनीष चौरसिया व सुमित्रा वऱ्हाडपांडे आदींच्या भूखंडांची लिलावाद्वारे विक्री करण्याचा इशारा देण्यात आला आहे.ज्या भूखंडधारकांनी मालमत्ता कर भरलेला नाही त्यांचे बाबतीत कार्यवाही प्रस्तावित आहे. ती टाळण्यासाठी कर भरावा असे आवाहन राजेश कराडे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)