शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या तीन अधिकार्‍यांना ३७ हजारांचा दंड माहिती न दिल्याचे भोवले : आयुक्तांंकडूनही मागितला खुलासा

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

राजू काळे

राजू काळे
भाईंदर : पालिकेच्या विविध विभागांची माहिती, माहिती अधिकारांर्गत मागूनही ती मुदतीत न दिल्याने आरटीआय कार्यकर्त्याने केलेल्या अपिलानुसार पालिकेच्या तीन अधिकार्‍यांना विभागिय माहिती आयुक्तांनी ३७ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच दोषी अधिकार्‍यांवर राज्य माहिती आयोगाने निर्देश देऊनही कारवाई केली नाही म्हणून पालिका आयुक्तांना येत्या १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरटीआय कार्यकर्ता संतोष कुमार तिवारी याने मार्च २०१४ रोजी पालिकेच्या मालमत्ता कर, अग्निशमन, नगररचना, परवाना व घनकचरा विभागाची माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता. मुदतीत माहिती न दिल्याने त्याने राज्य माहिती आयोगाकडे अपिल केले होते. आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी २६ मार्च २०१४ रोजी पालिका आयुक्तांना संबंधित अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन त्याचा अहवाल ३१ मे २०१४ पर्यंत आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तत्कालिन आयुक्त सुरेश काकाणी यांनी आस्थापना विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. परंतु, आस्थापना विभागातील काही अधिकार्‍यांनी कार्यवाहीच्या आदेशाची प्रतच गहाळ केली. परिणामी माहिती देण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने तिवारी यानी २५ जुलै २०१४ रोजी प्रथम अपिल केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१४ रोजीच्या सुनावणीत पालिकेच्या जनमाहिती अधिकार्‍यांनी मुदतीत माहिती देण्याचे आदेश संबंधितांना दिले.
................................................................................................
वारंवार माहिती मागूनही ती मिळत नसल्याने त्यांनी अखेर कोकण विभागीय माहिती आयुक्तांकडे अपिल केले. त्यावर २८ ऑगस्ट २०१५ रोजी घेतलेल्या सुनावणीत आयुक्त थँक्सी फ्रान्सिस थेकेकरा यांनी सध्याचे सहाय्यक आयुक्त हेमंत पाटील व कल्पिता पिंपळे-वडे यांना प्रत्येकी १५ हजार तर अधिकारी दशरथ हंडोरे यांना ७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच राज्य माहिती आयोगाने कार्यवाहीचे निर्देश देऊनही ती केल्याने सध्याचे आयुक्त अच्युत हांगे यांना भारतीय दंड संविधान कलम १६६ अन्वये गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, त्याचा खुलासा येत्या १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
....................................................................................................
याबाबत पालिका उपायुक्त (मुख्यालय) यांनी सांगितले की, घटनाक्रमानुसार सध्याच्या आयुक्तांना त्याची कल्पना नाही. तसेच सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे-वडे यांना प्रशासनाने अद्यापही जनमाहिती अधिकारीपदाचा कार्यभार सोपविलेला नाही. त्याचा खुलासा कोकण विभागीय माहिती आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले.