३०... सारांश
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:23+5:302015-01-31T00:34:23+5:30
निकृष्ट दर्जाच्या मुरमाचा वापर

३०... सारांश
न कृष्ट दर्जाच्या मुरमाचा वापरमेंढला : मेंढला - वाढोणा मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी रोडच्या कडेला मुरमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. तो मुरूम निकृष्ट असल्याचा आरोप सरपंच दयाराम सातपुते यांनी केला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये मुरमासह गिट्टीचा वापर करण्याची मागणीही केली आहे.***खंडाळा येथे हरिनाम सप्ताहपारशिवनी : तालुक्यातील खंडाळा येथील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाचे गुरुवारपासून आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कलशस्थापना, विष्णू सहस्त्रनामपाठ, भजन, प्रवचन, हरी कीर्तन यासह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सदर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.***संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनागपूर : कन्हान येथील श्रीसंत जगनाडे महाराज स्मृती सभागृहात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त कलश पूजन, आरती, भजन, प्रवचन यासह अन्य कार्यक्रम पार पडले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. या दोन दिवसीय कार्यक्रमाला शेकडो समाजबांधवांनी हजेरी लावली होती. ***तारसा येथे जनता दरबारतारसा : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आ. डी. एम. रेड्डी यांच्या जनता दरबाराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या. त्या समस्या सात दिवसांत सोडविण्याचे निर्देश आ. रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.***पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणीसावनेर : तालुक्यातील बहुतांश पांदण रस्ते खराब झाले आहे. त्यावरून साधे चालणे अवघड झाले असून, शेतीमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तालुक्यातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.***बुटीबोरी येथे श्रीमद् भागवत सप्ताहनागपूर : बुटीबोरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवारपासून श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रींची पालखी यात्रा, भजन, प्रवचन, हरिपाठ यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होईल. सदर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ***