शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे ३० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने परीक्षेला गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:51 IST

आंध्र प्रदेशात उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Andhra Pradesh:आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण या ताफ्यामुळे विशाखापट्टणममधील तीस विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा देण्यापासून वंचित राहावे लागले. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे अडवून ठेवल्यामुळे परीक्षेसाठी पोहोचू शकलो नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे आता आमचे वर्ष वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि ३० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेसाठी पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे आता जेईई मेन्स २०२५ ची परीक्षा चुकवलेल्या या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे विझाग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी करुन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे अशी काही घटना घडल्याचा दावा फेटाळला.

विशाखापट्टणम येथे आयओएन डिजिटल झोन इमारतीत विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची परीक्षा होती. परीक्षा सकाळी ८.३० वाजता सुरू होणार होती. एका महिलेने सांगितले की तिच्या मुलाला एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स २०२५ ची परीक्षा द्यायची होती पण वाहतूक कोंडीमुळे त्याला पोहोचायला उशिरा झाला. 

"आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होता. उपमुख्यमंत्री पवन कल्याण आराकू येथे जात होते त्यामुळे वाहतूक थांबण्यात आली होती. अभिनेते आणि उपमुख्यमंत्र्यांना जाता यावं म्हणून रस्ता रिकामा करण्यात आला. सकाळी ७.५० वाजता आम्ही एनएडी जंक्शनवर पोहोचलो होतो. तिथून परीक्षेच्या ठिकाणी जाण्यासाठी तब्बल ४२ मिनिटे लागली. त्यामुळे उशीर झाला आणि त्यांना परीक्षेसाठी आत जाऊ दिले नाही," असे एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले.

"३० विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.आम्ही वारंवार विनंती केली, पण आम्हाला आत जाऊ दिले नाही. जर परीक्षा केंद्राने पाच मिनिटांची सूट  दिली असती तर माझ्या मुलीचे संपूर्ण वर्ष वाया जाण्यापासून वाचले असते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत जात असतात. जर पोलिसांनी परीक्षा केंद्रावर थोडा वेळ वाढवून द्यायला सांगितला असता तर बरे झाले असते. माझ्या मुलीला दोन मिनिटे उशीर झाला म्हणून आत जाऊ दिले नाही," असं एका विद्यार्थिनीच्या पालकांनी सांगितले.

विशाखापट्टणम पोलिसांनी याप्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. ताफ्यामुळे विद्यार्थ्यांना उशीर झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सकाळी ८.४१ वाजता या परिसरातून गेला. विद्यार्थ्यांना उशिरा होण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. विद्यार्थ्यांना सकाळी ७ ते ८.३० च्या दरम्यान हॉलमध्ये पोहोचणे बंधनकारक होते, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशpawan kalyanपवन कल्याण