शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाओ’चे ३० लाख बनावट अर्ज!, बालकल्याण मंत्रालयापुढे नवी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:52 IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी कोणतेही अनुदान देण्याची तरतूद नसूनही तसे अनुदान मागणारे देशभरातून सुमारे ३० लाख अर्ज आल्याने महिला आणि बालकल्याण मंत्रालयापुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी कोणतेही अनुदान देण्याची तरतूद नसूनही तसे अनुदान मागणारे देशभरातून सुमारे ३० लाख अर्ज आल्याने महिला आणि बालकल्याण मंत्रालयापुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.हे सर्व फॉर्म ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे दोन लाख रुपयांचे अनुदान ‘डीबीटी’ पद्धतीने अर्जदारांच्या बँक खात्यांत थेट जमा करण्यासाठी आहेत. सरकारी योजनेत अशा प्रकारे अनुदान देण्याची कोणतीही तरतूद नसल्याने हे सर्व फॉर्म बनावट आहेत, हे उघड आहे.अशा प्रकारचे फॉर्म देशातील अनेक शहरांमध्ये स्टेशनरीच्या दुकानांमध्ये व जन सुविधा केंद्रांमध्ये प्रत्येकी पाच ते १० रुपयांना विकले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी बालकल्याण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रके काढून स्पष्ट केले होते की, या योजनेत असे कोणतेही अनुदान देण्यात येत नाही. तसेच त्यासाठी कोणतेही फॉर्म नाहीत. तरी लोकांनी अशा बनावट दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही केले गेले होते. तरी असंख्य लोकांना फसवून काही दलालांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतल्याचे आलेल्या फॉर्मस्च्या संख्येवरून दिसते.आता मंत्रालयाकडे आलेले सर्वाधिक बनावट अर्ज उत्तर प्रदेशातून आले आहेत. त्याखाळोखाल हरियाणा, पंजाब, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, प. बंगाल, राजस्थान आणि केरळ या राज्यातील लोकांनी अर्ज केले आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे समाजातील मुलींविषयीची मानसिकता बदलण्यासाठीचे जनजागृती अभियान आहे. त्यात मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून पैसे दिले जात नाहीत वा ते घेण्यासाठी कोणीही सरकारकडे आपली व्यक्तिगत माहिती देण्याची गरज नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)>सर्व फॉर्म नष्ट करणारमंत्रालयाने हे प्रकरण ‘सीबीआय’कडेही सोपविले होते. तरी असे फॉर्म येणे सुरूच राहिले. यातून काय मार्ग काढायचा, यावर विचार करण्यासाठी गेल्या महिन्यात महिला व बालकल्याण, गृह, विधी आणि न्याय अशा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयांची बैठकही झाली. हे फॉर्म निरर्थक असल्याने आणि त्ंयातील माहितीची संभाव्य दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारने आता हे सर्व फॉर्म नष्ट करून टाकण्याचे ठरविले आहे.