उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन 30 ठार

By Admin | Updated: July 1, 2016 14:21 IST2016-07-01T12:02:10+5:302016-07-01T14:21:13+5:30

उत्तराखंडमधील बस्ताडी गावासह अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

30 killed in cloudburst in Uttarakhand | उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन 30 ठार

उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन 30 ठार

ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. १ - उत्तराखंडमधील बस्ताडी गावासह अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक घरे वाहून गेल्याने नागरिक  बेघर झाले आहेत. उत्तराखंड राज्यातील पिथोरगड गावापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या बस्ताडी गावाला ढगफुटीचा मोठा फटका बसला असून आत्तापर्यंत ५ जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती गावक-यांनी दिली. 
तसेच मंदाकिनी नदीच्या काठावर असलेल्या गोपेश्वर व चमोली येथेही ढगफुटी झाली अनेक घरे वाहून गेली आहेत व ९ जणांचा मृत्यू झाला. 

Web Title: 30 killed in cloudburst in Uttarakhand