मेघालयात बस दरीत कोसळून ३० ठार, ११ जखमी
By Admin | Updated: June 16, 2016 03:26 IST2016-06-16T03:26:39+5:302016-06-16T03:26:39+5:30
मेघालयातील पूर्व खासी जिल्ह्याच्या सोनापूरमध्ये मंगळवारी रात्री एक बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ३० प्रवासी ठार तर ११ जखमी झाले.

मेघालयात बस दरीत कोसळून ३० ठार, ११ जखमी
शिलाँग : मेघालयातील पूर्व खासी जिल्ह्याच्या सोनापूरमध्ये मंगळवारी रात्री एक बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ३० प्रवासी ठार तर ११ जखमी झाले.
सिलचर- गुवाहाटी मार्गावर रात्री ९.४५ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सिलचर येथून गुवाहाटीला जात असलेल्या या बसमध्ये किमान ४० लोक प्रवास करीत होते. ताशी ९० किमीच्या वेगाने धावणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती ३०० मीटर खोल दरीत कोसळली (वृत्तसंस्था)