३०... गुन्हे

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30

तरुणाची विष प्राशन करून आत्म्हत्या

30 ... crime | ३०... गुन्हे

३०... गुन्हे

राजधानीतील वारांगनांची विविध शहरांत धाव
नरेश डोंगरे
नागपूर : पोलिसांच्या कारवाईमुळे गंगा जमुनातील वारांगना विस्थापित झाल्या असून यामुळे एक नवी सामाजिक समस्या निर्माण होण्याची भीती आरोग्य आणि स्वयंसेवी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विस्थापित वारांगना आता नागपुरातील विविध भागासह इतरत्र आश्रयाला जात असल्यामुळे एड्सचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
गंगाजमुनातच लहानांच्या मोठ्या अन् आता वृध्द झालेल्या वारांगनांच्या कथनानुसार, ब्रिटिश कालावधीत नागपूर शहराच्या पूर्वेला गंगाजमुना वस्ती वसली. ग्वाल्हेरमधील जलसा (तमाशा) करणाऱ्या महिला येथे आल्या. त्यांनी आपल्या नातेवाईक, समव्यावसायिकांनाही येथेच बोलवून घेतले. प्रारंभी पाच-पन्नास जणी राहाणाऱ्या या वस्तीत आता २००० वारांगना राहतात. बाहेरून (दर महिन्याला) ४०० वर वारांगना येथे देहविक्रयासाठी येतात. अर्थात् २४०० वारांगना गंगाजमुनात देहविक्रय करतात. महाराष्ट्रासह ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील वारांगनांची संख्या त्यात लक्षणीय आहे. विविध प्रांतातून येथे ग्राहक येतात. रेडक्रॉस सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१४ या एका महिन्यात १ लाख, ९६ हजार, ४६५ कंडोमचा येथे वापर झाला. त्यावरून ग्राहकांची वर्दळ लक्षात यावी. अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. मात्र, महिनाभरापूर्वी परिमंडळ तीनला उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या अभिनाश कुमार यांनी गंगाजमुनातील वेश्याव्यवसाय बंद करण्याची आग्रही भूमिका घेतली. परिणामी वारांगनांच्या अड्ड्यावर पोलिसांचे वारंवार छापे पडू लागले. गंगाजमुनाच्या प्रवेशमार्गावर मोठ्या संख्येत पोलीस उभे दिसत असल्याने ग्राहकांनी इकडे फिरणे बंद केले आहे. दुसरीकडे कारवाईचा धाक दाखवून पोलीस वारांगनांकडून मोठी वसुली करीत असल्यामुळे धास्तावलेल्या दीडएक हजारांवर वारांगनांनी गंगाजमुना सोडले आहे. यातील शंभरावर वारांगना एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे. या वारांगना आता ठिकठिकाणी देहविक्रय करण्यासाठी गेल्या आहेत. त्यामुळे एड्सच्या प्रसाराचा धोका वाढला आहे. कारण भीतीपोटी संबंधित वारांगना ग्राहकांना काही सांगणार नाही अन् त्याला क्षणिक सुखाच्या बदल्यात एड्स देतील. तो दुसरीला आणि दुसरी तिसऱ्याला अशा प्रकारे एड्सचा झपाट्याने फैलाव होईल.
----
कोण घेईल त्यांची काळजी

नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी अंतर्गत इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नागपूर शाखेतर्फे येथील वारांगनांची वर्षातून दोनदा एचआयव्ही टेस्ट आणि गुप्तरोग तपासणी केली जाते. दर तीन महिन्यांनी आरएमसी टेस्ट केली जाते. योग्य तो औषधोपचार केला जातो. आरोग्य चांगले राखण्यासाठी, एड्सची लागण होऊ नये म्हणून काय करावे, यासाठी वारांगनांचे समुपदेशन केले जाते. त्यामुळे एड्सचा फैलाव रोखण्यात काही अंशी का होईना येथील यंत्रणांना यश आले आहे. आता एचआयव्ही बाधित वारांगना बाहेर गेल्यामुळे कोण काळजी घेईल, असा भीतीयुक्त प्रश्न वारांगनांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अलका मानकर, पवन घाटे, प्रणाली लाभे, मंगला कडवे आदींनी उपस्थित केला आहे.
--
त्या सतर्क नसतात
वारंवार सांगूनही आरोग्याच्या बाबतीत त्या फारशा सतर्क नसतात. सतर्क असूनही ग्राहकांनी निरोध लावण्यास नकार दिल्यास विवशतेमुळे त्या धोका पत्करतात अन् त्यांना एड्सची लागण होते.
हेमलता लोहवे
प्रकल्प व्यवस्थापक, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा नागपूर.
-----

Web Title: 30 ... crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.