३०... भगवानपूर... वाघ

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:48+5:302015-01-30T21:11:48+5:30

बिबट्याचा मजुरावर हल्ला

30 ... Bhagwanpur ... tiger | ३०... भगवानपूर... वाघ

३०... भगवानपूर... वाघ

बट्याचा मजुरावर हल्ला
भगवानपूर शिवारातील घटना : शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
भगवानपूर : शेतात कामासाठी जात असलेल्या मजुरावर बिबट्याने हल्ला चढविला. मात्र, त्याने आरडाओरड करताच शिवारातील शेतकरी गोळा झाल्याने बिबट पळून केला. ही घटना भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारात गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
विलास मेश्राम व त्याचा मालक सागर मुंगले हे दोघेही गुरुवारी सायंकाळी शेतात कामासाठी जात होते. दरम्यान, दिलीप भंडारे यांच्या शेतातील गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने विलासवर झडप घातली. विलासने जवळ असलेल्या काठीच्या मदतीने बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याने व सागर मुंगले यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे काही वेळातच परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी व मजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. थोड्याच वेळात बिबट तिथून पळून गेला.
या शिवारात दोन दिवसांपासून बिबट फिरत असल्याची माहिती शेतकरी अनिल घरत यांनी दिली. त्याने रात्रीच्यावेळी माकडांची शिकार केली असून, गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास बकऱ्यांच्या कळपावर झडप घालण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांनी आरडाओरड करताच तो पळून गेल्याचेही घरत यांनी सांगितले.
माहिती मिळताच वन कर्मचारी बोरकर आणि जळीत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या परिसरात फटाके फोडून त्या बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. या परिसरात बिबट्यासोबतच रानडुक्कर आणि रोह्यांचा वावर वाढला आहे. रोही व रानडुकर पिकांची नासाडी करीत आहे. त्यातच बिबट्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्यावेळी पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात जाणे बंद केले आहे. बिबट्याच्या भीतीमुळे मजूर शेतात कापूस वेचणीसाठीही जायला तयार नाही. शिवाय, शेतीची अन्य कामे रखडली आहेत. त्यामुळे या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली पिकांच्या नुकसानभरपाईची मागणीही केली जात आहे. (वार्ताहर)
***

Web Title: 30 ... Bhagwanpur ... tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.