३०.... बावनकुळे

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:39+5:302015-01-30T21:11:39+5:30

(फोटो)

30 .... Bavankule | ३०.... बावनकुळे

३०.... बावनकुळे

(फ
ोटो)
कोराडी देवी मंदिर विकास आराखडा तयार
चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती : देवस्थान सभागृहात मंदिर कमिटीची बैठक
नागपूर : जिल्ह्यातील कोराडी येथील मॉ जगदंबा देवस्थान मंदिर व परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कोराडी देवस्थानाच्या सभागृहात मंदिर कमिटीची बैठक शुक्रवारी दुपारी पार पडली. त्यास सदर विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात बावनकुळे यांनी सांगितले की, मंदिर व परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी ३०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला. सदर आराखडा तयार करण्याचे काम आर्किटेक्ट भिवगडे यांना देण्यात आले. ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भिवगडे यांना सहकार्य करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
या ३०० कोटी रुपयांमध्ये देवस्थान परिसराला नवे स्वरूप प्राप्त होणार आहे. यात सध्या मंदिर परिसरात असलेली दुकाने हलविणे, संपूर्ण देवस्थान परिसराला सुरक्षा भिंत बांधणे, परिसरातील तलावाचे सौंदर्यीकरण करणे, रस्त्यांचे डांबरीकरण करणे, बालोद्यानाची निर्मिती करणे, मुख्य प्रवेशद्वारापासून मातेचे दर्शन होईल असे नियोजन करणे, यात्री निवासाची कामे यासह हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे आदी कामे करण्यात येणार असून, या सर्व विस्तारित कामांसाठी एक स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सदर बैठकीला दयारात तडस्कर, केशव फुलझेले, स्वामी निर्मलानंद, ॲड. मुकेश शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव, जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता देहाडराय प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
***

Web Title: 30 .... Bavankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.