शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

110 फूट खोल बोअरवेलमध्ये तिने 31 तास दिली मृत्यूशी यशस्वी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 09:43 IST

बोअरवेलच्या 110 फूट खोल खड्ड्यात अडकलेली चिमुकली, प्रतिकूल परिस्थितीत एनडीआरएफच्या पथकाकडून चाललेले बचाव कार्य, अशा तब्बल 31 तास चाललेल्या जीवन-मृत्यूच्या या झुंजीत अखेर जीवन जिंकले.

मुंगेर (बिहार) - बोअरवेलच्या 110 फूट खोल खड्ड्यात अडकलेली चिमुकली, तिला वाचवण्यासाठी आर्त आक्रोष करणारी तिची आई, प्रतिकूल परिस्थितीत तब्बल 31 तास एनडीआरएफच्या पथकाकडून चाललेले बचाव कार्य, बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील एका गावात चाललेल्या जीवन-मृत्यूच्या या झुंजीत अखेर जीवन जिंकले. 21 तासांच्या अथक बचाव कार्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने आणि लष्कराच्या जवानांनी तीन वर्षांच्या या चिमुकलीला सुखरूपपणे बाहेर काढले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. घराच्या आवारात खेळत असलेली तीन वर्षांची सना 110 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आले. त्यांनी तात्काळ बचाव कार्यास सुरुवात केली. मात्र मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते.  जसजसा वेळ जात होता तसतसे ही चिमुकली वाचण्याची शक्यता धुसर होत होती. अखेर 31 तासांच्या बचाव कार्यानंतर एनडीआरएफचे पथक या चिमुकलीपर्यंत पोहोचले. बचाव कार्यादरम्यान मुलीचा पाय अडकलेला असल्याने तिला बाहेर आणण्यात थोडा उशीर झाला. या चिमुकलील सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंगेरचे एसपी गौरव मंगला यांनी सांगितले की, बोअरवेलमधून बाहेर काढण्यापूर्वी या चिमुलीला खाऊ आणि पाणी देण्यात आले. तसेच तिच्या डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून तिच्यासाठी चष्माही पाठवण्यात आला. पावसामुळे बचाव कार्याला थोडा उशीर झाला होता. यादरम्यान सनाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. तसेच मुंगेरच्या जिल्हा रुग्णालयात या चिमुकलीच्या इलाजासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेसुद्धा या बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते. 

 

टॅग्स :Biharबिहारnewsबातम्याIndiaभारत